mumbai police  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : मुंबईतील डान्स बारवर पोलिसांचा छापा; ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त, ६ मुलींची सुटका

डान्स बारमधून एकून ६ मुलींची सुटका करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Crime News : मुंबईमध्ये डान्स बारवरील कारवाईचे सत्र अजूनही सुरूच आहे. काल (शनिवारी) मध्यरात्री अंधेरी येथील सदानंद बारवर धाड टाकण्यात आली. समाज सेवा शाखेच्या कारवाई दरम्यान मॅनेजर, कॅशिअर, वेटर आणि सात व्यस्तींसह एकूण १८ जणांना अटक करण्यात आली आहे. (Latest Mumbai Crime News)

डान्स बारमधून एकून ६ मुलींची सुटका करण्यात आली आहे. सदानंद बारमध्ये अवैधरित्या ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार सुरू असल्याची माहिती समाज सेवाशेखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. माहितीची शहानिशा करून समाज सेवा शाखेने काल मध्यरात्री या बारवर धाड टाकली. यावेळी २२ हजार रुपयांची रोकड तसेच १ लॅपटॉप, स्पीकर आणि अम्प्लिफायर असा एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आंबोली पोलीस ठाण्यात या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास स्थानिक पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या डान्स बारवर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काळबादेवी परिसरात ३२ लाखांची रोकड लुबाडल्या प्रकरणी दोघांना अटक देखील करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी ही कारवाई करत खाजगी सुपरवायजरसह खाजगी महिला सुरक्षारक्षक अशा दोघांना यात अटक केली आहे. शनिवारी संध्याकाळी काळबादेवी परिसरात सेल्स टॅक्स अधिकाऱ्याचं सोंग घेत ही लूटमार करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

SCROLL FOR NEXT