हात काय, पाय सुद्धा लावेन; PI संजय निकमांची पत्रकारांना धक्काबुक्की (पहा व्हिडीओ) SaamTV
मुंबई/पुणे

हात काय, पाय सुद्धा लावेन; PI संजय निकमांची पत्रकारांना धक्काबुक्की (पहा व्हिडीओ)

प्रवेशाचे पास असताना देखील पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी पत्रकारांना मंडपामध्ये जाण्यापासून रोखल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबई मधील लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) हे प्रसिद्ध गणपती मंडळ आहे. या गणपतीच्या मंडपाबाहेर रिपोर्टींग (Reporting) करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना (Journalists) पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी एखाद्या गुंडाप्रमाणे धक्काबुक्की आणि अरेरावी केली आहे. लालबागच्या राजाचे कव्हरेज करण्यासाठी आलेल्या पत्रकारांकडे प्रवेशाचे पास असताना देखील पोलीस निरीक्षक संजय निकम (PI Sanjay Nikam) यांनी पत्रकारांना मंडपामध्ये जाण्यापासून रोखल. (Mumbai police push journalists near Lalbaug)

पहा व्हिडीओ-

लालबागच्या राजाचे कव्हरेज (Coverage) करण्यासाठी आलेल्या पत्रकारांकडे प्रवेशाचे पास असताना देखील पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी पत्रकारांना आत मंडपामध्ये जाण्यापासून रोखल दरम्यान पोलिस निरिक्षकांची अरेरावीची भाषा बघता पत्रकारांनी थोड सयंमाने बोला अशी विनंती केली मात्र हे महाशय जास्तच तापले आणि त्यांनी थेट पत्रकारांना धक्काबुक्की करत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांना आम्हाला हात लावू नका असं पत्रकारांनी म्हणताच "हात काय पाय देखील लावेन "अशा प्रकारच उद्धट वर्तन आणि भाष्य या पोलिस महाशयांनी केलं आहे. यावेळी निकमांनी मास्कही घातला नव्हता मग हे नक्की कोणाला शिस्त लावतायत असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

आज सकाळपासून संपुर्ण मुंबईसह राज्यातील जनतेला टेलेव्हीजनच्या (Television) माध्यमातून राज्यातील अनेक प्रसिद्ध गणरायांच दर्शन व्हाव यासाठी पत्रकार कव्हरेज करत आहेत. यावेळी त्यांना कोरोनासह अनेक संकटांचा सामना करावा लागत असतो. अशातच याच पत्रकारांकडे लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये प्रवेश करण्याचे अधिकृत पास असताना देखील या पोलिसांनी अशी अरेरावी करणं शोभते का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. शिवाय संजय निकमांच्या या वर्तनामुळे महाराष्ट्राच्या गृहखात्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्यांनीच जर अशी अरेरावी, गुंडगीरी केली तर कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न सान्यांना नागरिकांना पडत आहे.

दरम्यान लालबाग मध्ये घडलेल्या प्रकरणाचा आम्ही निषेध करतो, झाल्याप्रकाराची चौकशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip valase Patil) यांनी करावी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) स्वत: यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण (Pravin Darekar) दरेकर यांनी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Results : भाजपच 'दादा'! राष्ट्रवादीला जबरी धक्का, वाचा पुण्यातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी

CM देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; मामेभावाचा दारुण पराभव

Maharashtra Elections Result Live Update : सांगलीत भाजपनं केला करेक्ट कार्यक्रम; ४ प्रभागांमध्ये भाजपच्या पॅनलमधील सर्व उमेदवार विजयी

Mental Health: सकाळी उठल्यावर 'या' 5 गोष्टी चुकूनही करू नका, दिवसभर आळस अन् ताण येईल

Love Story: मुलगा हमाली करतो म्हणून नकार,आज आहे सुखी संसार; अशी आहे बिग बॉस फेम रोशन भजनकरची फिल्मी लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT