Varsova Police Station Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईत २५हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या अट्टल चोराला अटक, दोन सोनारांनाही बेड्या

मुंबईमध्ये वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दिवसा व रात्री घरफोडी, दरोड्याचा प्रयत्न इत्यादी प्रकारचे २५ गुन्हे दाखल आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> संजय गडदे

मुंबई : मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील सात बंगला परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घरफोडी करून चोरी करणाऱ्या अट्टल चोराला वर्सोवा पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. चोरीचा माल विकत घेणाऱ्या दोन सोनारांना देखील अटक करण्यात आली आहे. संजय गिरी अस या चोराचे नाव असून चोरीचा माल विकत घेणाऱ्या नेनसिंग दसाना व भिमसिंग दसाना या दोन सोनारांना देखील ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १७० ग्रॅम सोनं हस्तगत करण्यात आलं आहे. आरोपी संजय गिरी याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात तब्बल 25हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 ऑक्टोबर रोजी सात बंगला येथील नीलकमल सोसायटीत आरोपीने प्रवेश करून घराच्या मागील लोखंडी खिडक्या तोडून फ्लॅट क्रमांक 7 व 8 मध्ये प्रवेश करून तब्बल १३,४०,००० किंमतीची सोन्याचे दागिने व चांदीची भांडी चोरी केल्याची तक्रार फिर्यादीने दिले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वर्सोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण टीमने तपासासाठी पथक तयार करून परिसरातील तब्बल दीडशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीचा शोध घेतला. (Maharashtra News)

तब्बल दीडशेहून अधिक सीसीटीव्ही तपासणी केल्यानंतर गुन्ह्यामध्ये वापरलेली MH-48-CF8067 ही बाईक आरोपीची असल्याची माहिती प्राप्त करून आरोपीस त्याच्या विरार येथील घरातून अटक केली. तसेच अटक आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालमत्तेपैकी चांदीची

भांडी जप्त करण्यात आली.

तसेच आरोपी संजय गिरी याने सोन्याचे दागिने वितळवून त्याची लगड बनवून ती महालक्ष्मी ज्वेलर्स, विरार येथे नेनसिंग दसाना व भिमसिंग दसाना यांना विकली. त्यानुसार चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी दोन्ही सोनारांना अटक करून १७० ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे. अटक आरोपी संजय गिरी याच्यावर मुंबईमध्ये वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दिवसा व रात्री घरफोडी, दरोड्याचा प्रयत्न इत्यादी प्रकारचे २५ गुन्हे दाखल आहेत.

अटक आरोपी संजय गिरी याने वर्सोवा पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचा अन्य एक गुन्हा केला असून त्यास नमूद गुन्ह्यात अटक करून पुढील कारवाई करत असल्याची माहिती पोलीस अधिकारी विवेक खवळे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somwar che Upay: सोमवारी रूद्राक्षाचे करा 'हे' उपाय; यशाच्या शिखरावर पोहोचायला वेळ लागणार नाही

Ration Card KYC: मोठी बातमी! महाराष्ट्रातील तब्बल १,५०,००० रेशन कॉर्ड बंद, मिळणार नाही धान्य; तुमचंही नाव आहे का?

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

GST Reforms: खुशखबर! कार आणि बाईकच्या किंमती कमी होणार? जाणून घ्या केंद्र सरकारची मोठी योजना

SCROLL FOR NEXT