Restrictions On Firecracker In Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Police: नववर्षाच्या सेलिब्रेशनवर मुंबई पोलिसांची करडी नजर, फटाक्यांबाबत जारी केले कडक आदेश; वाचा सविस्तर माहिती

Mumbai News: नवीन वर्षाचं स्वागत करताना काही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं अहे. तसं न केल्यास तुम्ही अडचणीत फसू शकता. याच कारण म्हणजे नववर्षाच्या सेलिब्रेशनवर मुंबई पोलिसांची करडी नजर असणार अहे.

Satish Kengar

Restrictions On Firecracker In Mumbai:

अनेक मुंबईकरांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळे प्लान बनवले असतील. मात्र नवीन वर्षाचं स्वागत करताना काही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं अहे. तसं न केल्यास तुम्ही अडचणीत फसू शकता. याच कारण म्हणजे नववर्षाच्या सेलिब्रेशनवर मुंबई पोलिसांची करडी नजर असणार अहे. मुंबई पोलिसांनी नवीन वर्षाच्या आधी शहरातील काही भागात फटाके फोडण्याबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेशात म्हटलं अहे की, कोणत्याही व्यक्तीने बफर झोनच्या पलीकडे 500 मीटर अंतराच्या आत किंवा कोणत्याही ठिकाणी कोणतेही फटाके फोडू नये. तसेच चेंबूरमधील माहुल रोडवरील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडजवळील प्लांट आणि क्षेत्रे 31 जानेवारीपर्यंत या ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहेत असल्याची माहिती यात देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचे डीसीपी (ऑपरेशन्स) विशाल ठाकूर यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा एक नियंत्रित प्रतिबंधात्मक आदेश असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने 'मिड डे'शी बोलताना सांगितलं. या आदेशात पोलिसांनी फटाके वापरण्यास बंदी असलेल्या भागांची यादीही जारी केली आहे. जी खालीलप्रमाणे आहे. (Latest Marathi News)

1. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि, आणि हिंदुस्तान पेट्रोलियम, कॉर्पोरेशन लि, रिफायनरीच्या परिमितीच्या बाहेरील क्षेत्र.

2. माहुल टर्मिनल क्षेत्र.

3. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. बीडीयू प्लांट एरिया

4. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., बीडीयू प्लांट एरिया.

5. स्पेशल ऑइल रिफायनरी पर्यंत 15 आणि 50 एकर क्षेत्राच्या मागे.

परवान्याशिवाय फटाके विकण्यासही बंदी

या आदेशात पुढे असेही सांगण्यात आले अहे की, ''मुंबईच्या हद्दीतील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही व्यक्तीने पोलीस आयुक्त किंवा नियुक्त केलेल्या इतर कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या परवान्याशिवाय कोणतेही फटाके विकू नये.'' दरम्यान, पोलिसांनी 18 जानेवारीपर्यंत शहरात ड्रोन, पॅराग्लायडर, हँड ग्लायडर आणि हॉट एअर फुगे उडवण्यास बंदी घातली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : महिलांना गरोदर करा आणि १० लाख कमवा, प्रेग्नंट जॉब सर्विसच्या नावाखाली मोठा घोटाळा; नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठला, १० तोळ्यामागे ११,५०० रुपयांची वाढ, वाचा आजचे भाव

Prabhas : बाईsss काय हा प्रकार! प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग, प्रेक्षकांमध्ये उडला गोंधळ, पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT