Mumbai Police Constable Dies Saam
मुंबई/पुणे

वरळी सी लिंकवर थरारक अपघात! चारचाकीने पोलीस हवालदाराला चिरडलं, जागीच मृत्यू

High-Speed Car Hits Police: वरळी कोस्टल रोडवर भीषण अपघात; पोलीस हवालदार दत्तात्रय कुंभार यांचा मृत्यू. व्हिआयपी बंदोबस्तादरम्यान भरधाव चारचाकीची जोरदार धडक.

Bhagyashree Kamble

  • वरळी कोस्टल रोडवर भीषण अपघात; पोलीस हवालदार दत्तात्रय कुंभार यांचा मृत्यू

  • व्हिआयपी बंदोबस्तादरम्यान भरधाव चारचाकीची जोरदार धडक

  • महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

  • पोलिसांनी आरोपी वाहनचालकाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला

मुंबईतील पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वरळी लिंक कोस्टल रोडवर भीषण अपघात घडला आहे. या रस्ते अपघातात पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला आहे. व्हिआयपी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडत असताना भरधाव चारचाकी आली. चारचाकी वाहनानं त्यांचा जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ते जागीच कोसळले. या घटनेनंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

दत्तात्रय शंकर कुंभार असे मृत पोलीस हवालदाराचे नाव आहे. कुंभार हे शिवडी पोलीस स्टेशनच्या माजी एटीएस पथकात कार्यरत होते. सध्या ते वरळी पोलीस स्टेशनला नियुक्त होते. सागरी किनारा मार्ग आणि वरळी सी लिंकच्या कनेक्टिंग पॉईंटजवळ हा अपघात घडला.

प्राथमिक माहितीनुसार, व्हिआयपी बंदोबस्तासाठी काही पौलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात होते. काही वेळानं भरधाव चारचाकी आली. या चारचाकीनं एका पोलीस कर्मचाऱ्याला उडवलं. या भीषण अपघातात दत्तात्रय शंकर कुंभार यांचा जागीच मृत्यू झाला. तर, एक महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने होकार्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीच्या तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी अवघ्या काही तासाच चारचाकी चालकाला ताब्यात घेतलं. सध्या त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेनंतर पोलिस दलात शोककळा पसरली असून, कुंभार कुटुंबावरही दुखा:चा डोंगर कोसळला आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Famous Food: साताऱ्यातील प्रसिद्ध 5 पदार्थ, एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra Live News Update: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज वडवणी शहर कडकडीत बंद

Gold Rate Today: सोनं झालं आणखी स्वस्त! १० तोळ्यामागे ८२०० रुपयांची घसरण; वाचा आजचे दर

Maharashtra Politics: शरद पवारांना धक्का बसणार? महत्त्वाच्या बैठकीला ३ आमदारांची दांडी, पक्षात जोरदार चर्चा

White & Pink Guava : गुलाबी आणि सफेद पेरुमध्ये काय फरक असतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT