Sameer Jadhav  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Latest News : पोलीस कॉन्स्टेबलचा मांजाने गळा चिरून मृत्यू, मुंबईतील वाकोला ब्रिजवरील घटना

Mumbai Police constable dies after kite string slits his throat : बाईकवरुन जात असताना मांजाने गळा चिरुन ते गंभीर जखमी झाले होते. वाकोला ब्रिज येथे हा प्रकार घडला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड

Mumbai News :

मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा ड्युटीवरुन घरी जात असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मांजाने गळा चिरुन पोलीस अंमलदाराचा मृत्यू झाला आहे. समीर जाधव असं मृत पोलीस अंमलदाराचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर जाधव हे दिंडोशी  पोलीस ठाण्यात कार्यरत होते. नियमितपणे ते रविवारी देखील आपलं कर्तव्य बजावून घरी निघाले होते. बाईकवरुन जात असताना मांजाने गळा चिरुन ते गंभीर जखमी झाले होते. वाकोला ब्रिज येथे हा प्रकार घडला होता.  (Latest Marathi News)

समीर यांना जखमी अवस्थेत सायन रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. समीर यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांना दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर पोलीस दलावरही शोककळा पसरली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मांजाला धार आणण्यासाठी काच आणि लोखंडाच्या किसाचा सर्रास वापर केला जातो. जे अनेकदा लोकांच्या जीवावर बेततं. मांजा बनवण्यासाठी काच आणि लोखंडाच्या किसाचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

Late Night Sleeping Problem: रात्री २-३ वाजेपर्यंत जागे राहिल्याने शरीरात होतात 'हे' चिंताजनक बदल

SCROLL FOR NEXT