NALASOPARA SPA CENTRE RAID: 6 WOMEN RESCUED, ACCUSED ARRESTED IN POLICE ACTION Saam Tv
मुंबई/पुणे

Sex Racket Bust : स्पा सेंटरच्या आडून सुरु होती देह विक्री, ६ महिला आणि २ पुरुष नको त्या अवस्थेत; पोलिसांनी दार उघडलं अन्...

Nalasopara Sex Racket Bust Update News : नालासोपारा पश्चिमेतील रिगल स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकत ६ महिलांची सुटका केली. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून स्पा सेंटर चालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • नालासोपारा पश्चिमेतील रिगल स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा

  • कारवाईदरम्यान ६ महिलांची सुटका

  • स्पा सेंटरच्या मालकासहित तिघांना अटक

  • पुढील तपास सुरु

नालासोपारा परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नालासोपारा पश्चिमेत एका स्पा सेंटरमध्ये देह विक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी संबंधित स्पा सेंटरमध्ये धाड टाकली. पोलिसांना यावेळेस ६ महिलांसह २ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच स्पा सेंटरच्या चालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने नालासोपारा परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिम येथील रिगल स्पा सेंटरमध्ये देह विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची सत्यता तपासल्यानंतर पोलिसांनी प्लॅन आखला. ठरलेल्या प्लॅननुसार रिगल स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी धाड टाकताच धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या.

कारवाईदरम्यान पोलिसांनी सहा महिलांची सुटका केली. या प्रकरणात महेश चव्हाण (२२) आणि कमलेश पाठक (५२) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय स्पा सेंटरचा संचालक भीमसेन नायक यालाही आरोपी करण्यात आले असून त्याचा या रॅकेटशी असलेला संबंध तपासला जात आहे.

कारवाईदरम्यान या स्पा सेंटरवरून पोलिसांनी सहा महिलांची सुटका केली. या प्रकरणात महेश चव्हाण (२२) आणि कमलेश पाठक (५२) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय स्पा सेंटरचा संचालक भीमसेन नायकलाही पोलिसांनी अटक केली आहे. छाप्यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाची कागदपत्रे तसेच इतर पुरावे जप्त केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चौकशी सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Police Fraud: खाकी वर्दीला भ्रष्टाचाराचा विळखा, पोलीस दलात वेतन घोटाळा; बोगस पोलिसांच्या नावे कोट्यवधींवर डल्ला

Maharashtra News Live Update: आंबोली महादेवगड येथील खोल दरीत पर्यटक कोसळला

Curry Leaves Benefits : केसगळती ते डायबेटिस...रोज कढीपत्ता खाल्ल्यानं होतील ६ जबरदस्त फायदे, वाचा

Sunetra Pawar : जनाची तरी लाज बाळगा; सुनेत्रा पवारांवर टिप्पणी करणाऱ्या काँग्रेसवर शिंदे कडाडले

Maharashtra Politics: राष्ट्रवादीत मोठी घडामोड! शरद पवार पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या बरखास्त

SCROLL FOR NEXT