Police Recruitment Exam Saam Tv
मुंबई/पुणे

Police Recruitment Exam: मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार; मुन्नाभाई स्टाईलने कॉपी करणाऱ्या ३ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

Mumbai Police Bharti Copy In Exam: मुन्नाभाई स्टाईलने कॉपीमुन्नाभाई चित्रपटात अभिनेता संजय दत्त ज्याप्रकारे वैद्यकीय परीक्षा पास होतात.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Police Bharti: मुंबई पोलीस भरती दरम्यान अनेक ठिकाणी कॉपीचे प्रकार समोर आले होते. आता देखील ३ विद्यार्थ्यांविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस दलात भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत गैरप्रकार केल्याचा आरोप या विद्यार्थ्यांवर करण्यात आलाय. (Latest Mumbai Police Bharti News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुंबई पोलीस भरती 2021 च्या भरती प्रक्रियेत रुईया कॉलेज येथे या तीन विद्यार्थ्यांचे सेंटर आले होते. त्यावेळी या तीनही विद्यार्थ्यांनी कॉपी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. मुन्नाभाई स्टाईलने कॉपी मुन्नाभाई चित्रपटात अभिनेता संजय दत्त ज्याप्रकारे वैद्यकीय परीक्षा पास होतात. तशीच काहीशी पद्धत पोलीस भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यांनी अवलंबली होती.

या तीनही विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी रुईया विद्यालय हे सेंटर आले होते यावेळी आरोपींनी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि ब्लूटूथचा वापर करून पेपर सोडवल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात मनीषा साबळे, नागनाथ गौंडे, वैजीनाथ आखारे या तिघांविरोघात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहे.

सहा पोलीस अंमलदार निलंबित

मुंबई पोलिसांच्या सशस्त्र पोलीस (ताडदेव) विभागातील सहा पोलीस अंमलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.१ मे ते २१ जून दरम्यान कर्तव्याच्या ठिकाणी हजर न राहिल्याचं समोर आल्याने पोलीस अंमलदारांवर कारवाई करण्यात आली आहे. निलंबित पोलीस अंमलदारांमध्ये एल शाखेच्या दोन कारकुनांचा देखील समावेश आहे.

रजा नोंदवहीच्या तपासणीत चार अंमलदारांच्या रजेच्या अर्जावरील स्वाक्षरीत तफावत आढळली होती. दोन करकुंनानी इतरांशी संगनमत करून अभिलेखात कर्तव्य वाटप केल्याचे निदर्शनास आले होते. खोटी माहिती नमुन करून वरिष्ठांची दिशाभूल केल्याने सहा पोलीस अंमलदारांना निलंबित करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Friend: तुमच्या आजूबाजूला असलेले फेक फ्रेंड्स कसे ओळखायचे? जाणून घ्या 'या' सिक्रेट टिप्स

Manikrao Kokate News: कॅबिनेटमधून कोकाटे आऊट मुंडे इन? मंत्रिपदासाठी मुंडेंची दिल्ली दरबारी फिल्डिंग

Chanakya Niti: फक्त मेहनत अन् शिस्त नव्हे, यशस्वी लोकांची ही गुपितं करा फॉलो, शत्रूही होतील मित्र

Dhurandhar: 'धुरंधर'नं मोडली दक्षिणेची मक्तेदारी; बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'ची 400 कोटींची कमाई

ड्रोनने रेकी, महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास; पोलिसांकडून सिनेस्टाईल अटक

SCROLL FOR NEXT