Chandrapur Police Arrested: अल्पवयीन मुलीची छेड काढत मित्रांना केली मारहाण, पोलीस कर्मचाऱ्यासह पाच जणांना अटक

Chandrapur Crime News: जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्र परदेशी यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी आरोपी पोलिसाला तात्काळ निलंबित केले आहे.
Chandrapur News
Chandrapur NewsSaam TV
Published On

संजय तुमराम, चंद्रपूर

Chandrapur News: चंदपूरमध्ये (Chandrapur) अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी (minor girl molested) एका पोलिसासह पाच जणांना पोलिसांनी अटक केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे चंद्रपूर पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्र परदेशी यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी आरोपी पोलिसाला तात्काळ निलंबित केले आहे.

Chandrapur News
Ahmednagar News: वाह रे पठ्या! संगमनेरचा राहुल झाला चीनचा जावई; 'हद्द' ओलांडून बांधली लग्नगाठ

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहराजवळ असलेल्या मामला परिसरात 2 जुलैला ही घटना घडली. 2 जोडपे या परिसरामध्ये फिरण्यासाठी गेले होते. हे दोन्ही जोडपे रस्त्यावर दुचाकी उभी करुन त्यावर बसले होते. त्याचवेळी मामला येथून चंद्रपूरकडे कारमधून पाच तरुण जात होते. या तरुणांनी या जोडप्यांना पाहून कार थांबवली. त्यानंतर त्यांनी धिंगाणा करत जोडप्यांना मारहाण केली. ऐवढंच नाही तर त्यांनी शिवीगाळ करत अल्पवयीन मुलींची छेड देखील काढली.

Chandrapur News
Beed News : हा फार्स कशासाठी, अजित पवारांना दिव्यांगांचा सवाल ? जिल्हा परिषद परिसरात छेडलं आंदाेलन

अचानक घडलेल्या या प्रकाराने मुली घाबरल्या. मारहाण करणारे युवक हे दारूच्या नशेत होते. या मुलींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता आणखी एक कार घटनास्थळी आली. त्यामधील दोघांनी एका मुलीचा हात पकडत तिला जबरदस्ती कारमध्ये बसविले. या मुलीला कारमध्ये मागे बसवत तिची छेड काढण्यात आली. पीडित मुलीने विरोध करत तिथून पळ काढला. अल्पवयीन मुलीने छेड काढणाऱ्या पाचही तरुणांविरोधात तक्रार दाखल केली. या तरुणांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे.

Chandrapur News
Mumbai-Agra Highway Accident: धुळ्यामध्ये भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये घुसला, 13 जणांचा मृत्यू; 20 ते 25 जण जखमी

आरोपी पोलीस कर्मचारी चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयात C-60 मध्ये कार्यरत होता. सचिन बावणे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सचिन बावणे याच्यासह चंद्रपूरातील चव्हाण कॉलनी येथे राहणारे संतोष कुशवाहा, महेंद्रसिंग सनोतरा, शंकर पिल्ले आणि संतोष कानके या पाचही आरोपींना अटक केली. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी पोलीस कर्मचारी सचिन बावणे याला तात्काळ निलंबित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com