मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणं एका व्यक्तीला चांगलचं महागात पडलं आहे. या प्रकरणी मुंबई क्राइम ब्रँच युनिट -12 ने एकास अटक केली आहे. प्रदीप भालेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी (Mumbai Police) प्रदीपला न्यायालयात हजर केलं असता, त्याला 30 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रदीप भालेकर हा सातत्याने प्रतिष्ठित व्यक्तीने विरोधात फेसबुक आणि ट्विटर च्या माध्यमातून टीका करत असल्याचा समता नगर पोलिसांचा दावा आहे.
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याबाबतही आक्षेपार्य ट्विट केल्यामुळे प्रदीप भालेकर याच्यावर कारवाई झाली होती. पोलिसांनी प्रदीप भालेकर याचा मोबाईल जप्त केला असून समता नगर पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.