महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Rukhvat Movie: महाराष्ट्रातील सांस्कृतिक महत्त्व आणि परंपरा "रुखवत" या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
movie
moviesaam tv
Published On

महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जुनी परंपरा म्हणजे "रुखवत", जी विशेषतः लग्नाच्या पारंपरिक रीतिरिवाज यांसोबत जोडली गेली आहे. महाराष्ट्रातील सांस्कृतिक महत्त्व आणि परंपरा "रुखवत" या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी या चित्रपटाचा धमाकेदार मोशन पोस्टर प्रदर्शित झाला आहे.

movie
Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

‘रुखवत’च्या मोशन पोस्टर मध्ये वधू-वराच्या वेशात सुंदर नटलेली बाहुला -बाहुली, मंगळसूत्र आणि हळदी-कुंकू लग्नसरायच्या धावपळीत लोकांचं लक्ष वेधून घेतेय. पोस्टर मध्ये खास आकर्षण असलेल्या संतोष जुवेकर आणि प्रियदर्शिनी इंदलकरच्या जळत्या फोटोमुळे या चित्रपटाच्या कथेची गोडी आणि गांभीर्यता स्पष्टपणे दिसून येत आहे. रुखवत मध्ये दोन प्रेमवेड्यांची कहाणी अनोख्या पद्धतीने पाहायला मिळणार असल्याची चाहूलही मिळतेय.

संतोष जुवेकर, प्रियदर्शिनी इंदलकर,अशोक समर्थ,अभिजीत चव्हाण आणि राजेंद्र शिसातकर हे ‘रुखवत’ या चित्रपटात खास भूमिकेत दिसणार आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम प्रधान यांनी केले आहे. विक्रम प्रधान हे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या कथा आणि चित्रणाद्वारे दर्शकांना वेगवेगळ्या अनोख्या अनुभवांची वासना दिली आहे.

movie
Abeer Gulal Serial: श्री पुन्हा अडकणार संकटात, शुभ्राचा कट यशस्वी; 'अबीर गुलाल' मालिकेत नवा ट्विस्ट

रुखवत हा चित्रपट अल्ट्रा मीडिया & एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, रब्री प्रोडक्शन निर्मित आणि निर्माती ब्रिंदा अग्रवाल द्वारे १३ डिसेंबर २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम प्रधान यांनी केले आहे. विक्रम प्रधान हे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या कथा आणि चित्रणाद्वारे दर्शकांना वेगवेगळ्या अनोख्या अनुभवांची वासना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com