VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

Hadapsar Huge Fire Broke : हडपसर परिसरातील एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीत अडकलेल्या 2 लहान मुलांना वाचवण्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.
Hadapsar Fire News
Hadapsar Fire NewsSaamTv
Published On

पुणे (Pune News) : पुण्याच्या हडपसर परिसरातील एका तीन मजली इमारतीला आज सकाळी आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

मात्र आग लागली त्यावेळी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर 2 चिमुकली मुलं अडकलेली होती. स्थानिकांच्या मदतीने या मुलांना वाचवण्यात यश आलं असलं तरी या संपूर्ण घटनाक्रमाचा थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे. अवघ्या चार मिनिटांचा हा संपूर्ण थरार अंगावर काटा आणणारा असून सोशल मिडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पुण्यातील हडपसर भागात असलेल्या वैभव टॉकीज येथे भीमाशंकर सोसायटीच्या तीन मजली इमारतीला आज सकाळी १० वाजता आग लागली होती. तीन मजली असलेल्या या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर जिन्याच्या जागेत काही रॅक होते. तिथे काही फोटो फ्रेमसाठी बनवण्यात येणाऱ्या सामग्रीला अचानक आग लागली.

Hadapsar Fire News
Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

काहीच क्षणात या आगीने रौद्र रूप धरण केल्याने याठिकाणी धुराचे आणि आगीचे मोठे लोण पाहायला मिळाले. दरम्यान, त्याच मजल्यावर राहत असलेल्या एका कुटुंबातील २ लहान मुलं या आगीत अडकून पडली होती. यावेळी येथे उपस्थित एका स्थानिक तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट या आग लागलेल्या इमारतीवर चढून अडलेल्या या दोन्ही मुलांची सुखरूप सुटका केली.

Hadapsar Fire News
Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

या संपूर्ण प्रकारचा थरार उपस्थितांनी मोबाइलमध्ये कैद केला आहे. तरुणाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे या दोन्ही मुलांचा जीव वाचल्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याच्या कृतीचं कौतुक यावेळी केलं. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून या तरुणाच्या धडसाचं सगळ्यांकडून कौतुक केलं जात आहे.

Hadapsar Fire News
Maharashtra Politics : भाजपला विनंती, उद्धव ठाकरे म्हणाले मी बोलणी करायला तयार

दरम्यान, आगीच कारण अद्याप समजलेलं नसलं तरी पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जलद प्रतिसादामुळे सर्व रहिवाशांना इजा किंवा जीवितहानी न होता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. आग पूर्णपणे आटोक्यात आली असून जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी ज्वाला आटोक्यात आणण्यासाठी त्वरीत काम केल्याने आजूबाजूच्या परिसरात ही आग सुदैवाने पसरली नाही.

Edited By Rakhi Rajput

Hadapsar Fire News
BKC Metro Fire: बीकेसी मेट्रो स्टेशनला आग; आगीमुळे सर्व मेट्रो थांबवल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com