Police Bharati 2022 : पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात पोलीस शिपाई पदाच्या रिक्त जागा (Police Recruitment) लक्षात घेता, पोलीस भरतीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलिस दलातील विविध जिल्ह्यातील तब्बल १४ हजार ९५६ जागासाठी ही भरती असणार आहे. माहितीनुसार, दोन टप्प्यात या जागा भरल्या जाणार आहे. (Maharashtra Police Bharati Latest News)
पहिल्या टप्प्यातील रिक्त जागांसाठी ३ नोव्हेंबर २०२२ पासून अर्ज सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२२ असणार आहे. या संदर्भातील अधिकृत वेबसाईट वर GR आणि माहिती अजून यायची आहे. राज्यात विविध जिल्ह्यातील तब्बल १४ हजार ९५६ जागासाठी ही भरती असणार आहे. (Police Bharati 2022 Latest News)
सर्वाधिक जागा मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात भरल्या जाणार आहे. प्राथामिक माहितीनुसार, मुंबईत पोलिसांच्या तब्बल ६ हजार ७४० रिक्त जागा भरल्या जाणार आहे. मुंबई पाठोपाठ ठाणे, मिराभाईंदर, पुणे व पुणे ग्रामीणसह रेल्वे पोलिस दलातही मोठ्या प्रमाणात जागाही भरल्या जाणार आहे.
गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकरभरतीची प्रक्रिया थांबली होती. यामुळे अनेक विद्यार्थी पोलीस भरतीची वाट पाहत होते. कोरोनाचा फटका पोलीस भरती प्रक्रियेला बसल्याने आवश्यकता असताना राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकली नाही.
राज्याची लोकसंख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाची गरज आहे. त्यामुळे आता राज्य सरकाराने सुरू केलेल्या हालचालीमुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता आता भरती प्रक्रिया गृहखातं राबवणार असल्याचे कळते.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.