MUMBAI PETROL TO BE ₹5 CHEAPER: MNS ANNOUNCES SPECIAL RELIEF FOR CITIZENS saam tv
मुंबई/पुणे

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

MNS Offers ₹5 Discount on Petrol : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जाहीर केलेल्या एका विशेष उपक्रमांतर्गत मुंबईकरांना ५ रुपये स्वस्त दरात पेट्रोल मिळणार आहे. वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या दरांपासून दिलासा देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Bharat Jadhav

  • मुंबईकरांसाठी पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त देण्याची मनसेची घोषणा.

  • मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली माहिती.

  • वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न.

महागाईची मार सहन करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईत पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. हो, हो, तुम्ही जे वाचत आहात, ते कधी खरं आहे. मुंबईतील नागरिकांच्या खिशावरील भार कमी होणार आहे. मुंबईतील नागरिकांना पेट्रोल तब्बल ५ रुपयांनी स्वस्त दराने मिळणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांन घोषणा केली आहे. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. महागाईचा भार पेलणाऱ्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ही सवलत एका दिवसासाठी दिली जाणार आहे. जे गरीब वर्गातील लोक आहेत. ज्यांच्याकडे दुचाकी आहे , त्यांना दिलासा मिळावा म्हणून आज ज्या किमतीने पेट्रोल मिळत आहे, त्यात ५ रुपयांनी पेट्रोल स्वस्त मिळणार आहे.

जनता महागाईमध्ये होरपळून निघत आहे, केंद्र सरकार त्यांना दिलासा देऊ शकत नाही. त्यामुळे मनसे आपल्या कुवतीप्रमाणे एक दिवस का होईना दिलासा देणार आहे. मुंबईकरांना ५ रुपयांनी स्वस्त पेट्रोल देणार आहे. मनसेनं संपूर्ण मुंबईतल ३६ पेट्रोल पंप घेतले आहेत, त्या पंपावर सगळ्या दुचाकीधारकांना पाच रुपयांनी स्वस्त पेट्रोल मिळणार आहे.

पेट्रोल-डिझेल खरेदीवर मर्यादा, दिवसाला किती लीटर इंधन मिळणार?

पेट्रोल आणि डिझेल खरेदीच्या मर्यादेवर केंद्र सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमांनुसार एका दिवसात फक्त २०० लीटर पेट्रोल आणि डिझेल खरेदी करता येणार आहे. नवीन सरकारी आदेशानुसार, औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक वापरकर्त्यांना पेट्रोल पंपांवरून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यास तात्काळ मनाई करण्यात आलीय. नवीन सरकारी आदेशानुसार, मोठ्या प्रमाणात आणि संशयास्पद खरेदीदारांना आळा घालण्यासाठी दैनंदिन तेल खरेदीची मर्यादा निश्चित करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अकोला जिल्ह्यात बजाज फायनान्सविरोधात वंचित बहुजन आघाडीचे लोटांगण आंदोलन

Garba Special Blouse Designs: नजरेत भरेल असं सौंदर्य! गरब्यासाठी लेहेंग्यावर उठून दिसतील असे 5 बॅकलेस ब्लाऊज

भाजपला मोठा धक्का! गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज रद्द; राजकारणात खळबळ|VIDEO

Kidney health: तुमच्या किडनीला होऊ शकतो धोका; या ७ वाईट सवयी आताच सोडा, अन्यथा...

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारचा मास्टर प्लॅन; जिल्हाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT