Atal Setu Mumbai Trans Harbour Link  x
मुंबई/पुणे

Atal Setu : आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास, 'अटल सेतू'मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

Atal Setu Mumbai Trans Harbour Link : उद्घाटन झाल्यापासून ते आतापर्यंत अटल सेतूवरुन तब्बल १.३ कोटींपेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे. खासगी गाड्यांनी अटल सेतूचा सर्वाधिक वापर केला आहे.

Yash Shirke
  • १२ जानेवारी २०२४ रोजी अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले.

  • १३ जानेवारी २०२४ रोजी अटल सेतू सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला.

  • १३ जानेवारी ते आतापर्यंत अटल सेतूवर १.३ कोटींपेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे.

Atal Setu : अटल सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) १३ जानेवारी २०२४ पासून सर्वसामान्यांच्या वापरासाठी खुला करण्यात आला. जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत अटल सेतूवरुन तब्बल १.३ कोटींपेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे. अटल सेतूचा सर्वाधिक वापर खासगी वाहनांनी केल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने दिलेल्या आकडेवारीनुसार, १३ जानेवारी २०२४ ते २४ जुलै २०२५ या कालावधीमध्ये २२ किमी लांबीच्या अटल पुलावरुन एकूण १,३१,६३,१७७ वाहनांनी प्रवास केला आहे. त्यापैकी १.२ कोटींपेक्षा जास्त गाड्या या खासगी गाड्या आहेत. अटल सेतूवरील वाहतुकीपैकी ९१ टक्के प्रवास खासगी वाहनांनी झाला आहे.

उर्वरित वाहतुकीमध्ये हलकी वाहने (एलसीव्ही मिनीबस), बस, ट्रक, मल्टी-अ‍ॅक्सल वाहने यांच्यासह मोठ्या आकाराच्या वाहनांचा समावेश आहे. एलसीव्ही मिनीबसने अटल सेतूवर १,७१७११ फेऱ्या मारल्या आहेत. २-अ‍ॅक्सल बस आणि ट्रकने २,०२,८६४ फेऱ्या मारल्या आहेत. मध्यम-जड मल्टी-अ‍ॅक्सल वाहनांनी एकत्रितपणे ७,००,९८९ फेऱ्यांचा प्रवास केला आहे. १,५३७ मोठ्या आकाराच्या वाहनांनी अटल सेतूने प्रवास केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ जानेवारी रोजी अटल सेतूचे उद्घाटन केले होते. एकूण २२ किमी लांबीपैकी ही लिंक १६.५ किमी समुद्रावरुन आणि ५.५ किमी जमिनीवरुन जाते. देशातील सर्वात लांब सागरी लिंक असलेल्या या पुलामुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास एका तासावरुन फक्त २० मिनिटांवर आला आहे.

१३ जानेवारी २०२४ रोजी म्हणजेच अटल सेतूच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी २८,१७६ वाहनांनी पुलाचा वापर केला. यामुळे ५४.७७ लाख रुपये टोल महसून निर्माण झाला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ जानेवारी रोजी वाहनांची संख्या तब्बल दुप्पट होऊन ५४,९७७ इतकी झाली होती. त्यामुळे टोलमार्फत १.०६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT