Home Triangle app cleaning service Saam TV
मुंबई/पुणे

दिवाळीची साफसफाई पडली महागात! ॲपवरून बोलावलेल्या कामगारांनी सोने-चांदीवर मारला डल्ला, मुंबईत नेमकं काय झालं?

Mumbai jewellery theft case : दिवाळीच्या साफसफाईसाठी ऑनलाइन ॲपवरून क्लिनिंग सर्व्हिस बुक करणे मालाडमधील महिलेला महागात पडले.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Home Triangle app cleaning service : दिवाळीच्या साफसफाईसाठी ऑनलाइन ॲपवरून होम क्लिनिंग सर्व्हिस बुक करणे मालाडमधील एका महिलेला चांगलेच महागात पडले. होम क्लिनिंगच्या बहाण्याने घरात आलेल्या कर्मचाऱ्यांनी बेडरूममधील कपाटातून सुमारे १२ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मालाड पश्चिम परिसरात राहणाऱ्या ५२ वर्षीय महिलेने दिवाळीनिमित्त घराची साफसफाई करण्यासाठी 'होम ट्रँगल' या ऑनलाइन ॲपद्वारे होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली होती. त्यानुसार कंपनीचे चार कर्मचारी त्यांच्या घरी साफसफाईसाठी आले होते. काम पूर्ण करून हे कर्मचारी निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी महिलेने बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने तपासले. मात्र, दागिने जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातून दागिन्यांची चोरी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी त्वरित मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ५० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे बिस्किट आणि ५०० ग्रॅम वजनाची चांदीची वीट यांचा समावेश होता. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे १२ लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) आणि ३(५) अंतर्गत २८ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अमर शिंदे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे 'होम ट्रँगल' ॲपद्वारे क्लिनिंगसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती तपासण्यात आली. यावेळी संबंधित व्यक्ती वारंवार मोबाईल फोन बंद करून लपत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावला.

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत नालासोपारा, वसई आणि पालघर परिसरातून दोन आरोपींना, तर मुख्य आरोपीला बोईसर येथून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता या चोरीच्या गुन्ह्यात त्यांचा सहभाग निष्पन्न झाला. त्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सत्यम राजेश शुक्ला (२६), अनिश ब्रिजभूषण चौरसिया (१८) आणि पवन ओमप्रकाश धीवर उर्फ राहुल गौड (२६) अशी आहेत. यातील पवन धीवर हा हाउसकीपिंग कॉन्ट्रॅक्टर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या कारवाईत चोरीस गेलेले सर्व सोने-चांदीचे दागिने आणि मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यात १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. ही धडाकेबाज कारवाई पोलीस उपनिरीक्षक अमर शिंदे, पोलीस हवालदार सातवसे, सावंत, जाधव तसेच पोलीस शिपाई डोईफोडे, आमटे आणि थोरात यांच्या पथकाने पार पाडली.

दिवाळीच्या साफसफाईसाठी ऑनलाइन ॲपवरून अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देताना नागरिकांनी संबंधित सेवा पुरवठादार आणि कर्मचाऱ्यांची ओळख व पार्श्वभूमी व्यवस्थित पडताळून पाहणे अत्यंत आवश्यक असल्याचे मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास लोकरे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Accident : रेल्वेचा भीषण अपघात! इंजिनशिवाय ६ किलोमीटर धावले ७ डब्बे; पाहा Video

Phulwara: 'घुंगरू पायाला नाही गं, काळजाला बांधून नाचावं!'; रवी जाधव यांच्या 'फुलवरा'ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

Junk Food Risks : चिप्स-बर्गरची सवय मुलांच्या मेंदूला करतेय खिळखिळी, नवीन संशोधनातील धक्कादायक माहिती

Maharashtra News Live Update: पावसामुळे रत्नागिरीत उडाली भातशेतीची दाणादाण, शेतकऱ्याचं मोठं नुकसान

EPFO WhatsApp Service : WhatsApp वर 'Hi' पाठवूनही PF माहिती मिळेना; EPFO ची नवी सेवा पहिल्याच दिवशी कोलमडली

SCROLL FOR NEXT