Amol kiritikar Saam tv
मुंबई/पुणे

Ravindra Waikar : वायव्य मुंबईतील चुरशीच्या लढतीत रविंद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी विजयी; अमोल कीर्तिकर पराभूत

Amol kiritikar latest News : वायव्य लोकसभा मुंबई मतदारसंघात रवींद्र वायकरांनी विजय मिळवला आहे. कीर्तीकर यांच्या पराभवाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकाल हाती आले आहेत. मुंबईतील वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे रवींद्र वायकर विजयी झाले आहेत. वायकरांच्या विजयाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. रवींद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले आहेत.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील अतितटीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे रविंद्र वायकर यांचा निसटता विजय झाला. रविंद्र वायकर यांचा अवघ्या ४८ मतांनी विजय प्राप्त केला. त्यांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांचा पराभव केला.

या मतदारसंघात निवडणूक अधिकाऱ्यांनी २००० मतांनी अमोल कीर्तिकर हे विजयी झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी ४८ मतांनी रविंद्र वायकर विजयी झाल्याचे जाहीर केले.

२६ फेऱ्यांची मतमोजणी झाली. त्यावेळी अमोल कीर्तिकर हे १ मताने आघाडीवर होते. २६ फेऱ्या झाल्यानंतर फेरमतमोजणी आणि बाद पोस्टल मतदानाची तपासणी करण्यात आली. त्यानंतर रविंद्र वायकर यांना ४८ मतांनी विजयी घोषित करण्यात आले.

विजयानंतर रविंद्र वायकर काय म्हणाले?

रविंद्र वायकर म्हणाले,'अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एका मताने पडलं होतं, हीच एका मताची ताकद आहे. मी 48 मतांनी जिंकल्याबद्दल खुश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरेंचा आभारी आहे. माझ्यावर विश्वास दाखवला, त्यांचे आभार. अमोल कीर्तिकर माझ्याच परिसरात राहतो आणि तो माझा शत्रू नाही. एवढ्या कमी फरकाने त्यांचा पराभव झाला. त्यामुळे मी अमोल यांना भेटायला आलो होता, मी सॉरी देखील बोललो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT