ng acharya and dk marathe college canva
मुंबई/पुणे

Mumbai News : जीन्स, टी-शर्ट, तोकडे कपडे घालून याल तर गेटबाहेरच राहा; मुंबईतील प्रसिद्ध कॉलेजच्या प्राचार्यांनी काढली नोटीस

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईच्या चेंबूरमधील एन जी आचार्य आणि डि के मराठे कॉलेज हे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. चेंबूरमधील हे कॉलेज विद्यार्थ्यांच्या यशावरून नाही, तर विद्यार्थ्यांच्या ड्रेसकोडवरून चर्चेत आले आहे. काही महिन्यापूर्वी विद्यार्थी-विद्यार्थिंनींना नकाब,हिजाब,बुरखा, टोपी घालून कॉलेजमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली होती. त्यानंतर आता या कॉलेजने नव्या नियमांची भर घातली आहे. प्राचार्यांनी या नव्या नियमांची नोटीस थेट कॉलेजच्या गेटवर लावली आहे.

मुंबईच्या चेंबूर विभागात एन जी आचार्य आणि डि के मराठे कॉलेज हे प्रसिद्ध आहे. या कॉलेजमध्ये चेंबूरमधील घाटला, गोवंडी, घाटकोपर या भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कॉलेजला येतात. मोठ्या संख्येने विद्यार्थी या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत.

चेंबूरमधील या कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या यशाऐवजी नियमांचीच अधिक चर्चा होत आहे. काही महिन्यांपूर्वी या कॉलेजमध्ये नकाब, हिजाब, बुरखा, टोपी घालून कॉलेजमध्ये प्रवेश करण्यात बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर या कॉलेजमध्ये फाटलेली जीन्स, टी-शर्ट आणि जर्सी घालून प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कॉलेजच्या प्राचार्याने नोटीस काढून विद्यार्थ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. याबाबची नोटीस थेट कॉलेजच्या गेट लावण्यात आली आहे. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन न करणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर देखील काढण्यात आले आहे. यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश देखील पाहायला मिळाला. तसेच या कॉलेजच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. याबाबत कॉलेजच्या प्रशासनाची विचारणा केली, मात्र कॉलेज प्रशासनाने उत्तर देणे टाळले आहे.

विद्यार्थ्यांचे म्हणणं काय?

विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे की, ' त्यांनी ड्रेसकोडविषयी माहिती दिली. कॉलेजने आम्हाला सांगितलं की, ट्राऊझर्स घालण्यास सांगितली आहे. फाटलेल्या जीन्स, टी-शर्ट घालून कॉलेजमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. कॉलेज प्रशासनाची व्हॉट्सअॅप ग्रुपवरही माहिती आली होती. मला वाटलं एवढी कडक कारवाई करणार नाही. मात्र, ड्रेसकोडमध्ये नसल्याने कॉलेजमध्ये प्रवेश करण्याआधी मला रोखलं'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

VIDEO : विधानसभेच्या तोंडावर थोरातांना मोठा धक्का !

SCROLL FOR NEXT