Andheri Crime News: बुरखा घालून भरदिवसा घरात शिरायचे अन्.., तरुणांच्या कृत्याने परिसरात भीती, पोलिसांकडून दोघांना अटक

Andheri Crime: एमआयडीसी पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल चोरांकडून हस्तगत केला आहे. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून सध्या ते चोर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात
Andheri Crime News
Andheri Crime NewsSaam TV
Published On

संजय गडदे

Mumbai Crime:

मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात चोरांचा सुळसुळाट पसरला आहे. अशआत एमआयडीसी पोलिसांनी अशा दोन चोरांना अटक केली आहे जे दिवसा कोणीही नसताना घरात शिरून चोरी करत होते. आपल्याला कोणी ओळखूनये यासाठी ते बुरखा घालून चोरी करत होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Andheri Crime News
Nandurbar Crime News : लक्ष्मीपूजनाच्या रात्री युवकाचा खून, नंदुरबारच्या अमृत चौकात पाेलीसांचा माेठा बंदाेबस्त

मात्र एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्याच्या मदतीने या आरोपींचा शोध घेऊन त्यांना मुंबईच्या वांद्रे परिसरातून अटक केली आहे. मो. रईस अब्दुल आहद शेख (३६ वर्षे)आणि वसिम खालीद खान उर्फ बिल्ला (३३ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या चोरांची नावे आहेत.

एमआयडीसी पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल चोरांकडून हस्तगत केला आहे. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून सध्या ते चोर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात असून जुन्या संदर्भात अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेकडील मुकुंद नगर सोसायटीत राहणाऱ्या जहीर इरशाद आली अन्सारी यांच्या घरात काम करणारी मुलगी त्यांच्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी घराचा दरवाजा पुढे ओढून बाहेर पडली. नंतर दोन अज्ञात बुरखाधारी घरात घुसून बेडरूममधील कपाटातून मुलीच्या फी साठीचे पैसे आणि सोन्याचे सव्वा चार लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन चोरी करून पळाले.

यासंदर्भात जाहीर इर्शाद आली अन्सारी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोऊपनि आनंदराव काशीद यांनी तपासाला सुरुवात केली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता यात दोन तरुण बुरखा घालून त्या इमारतीमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही फुटेज गुप्त बातमीदाराला दाखवून आरोपी संदर्भात माहिती मिळवली आणि दोन्हीही चोर वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली.

यानंतर सापळा रचून दोन्ही चोरांना वांद्रे भागातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनीच ही चोरी केली असल्याचे कबूल केले. दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार असून मुंबईतील २५ पेक्षा अधिक पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर चोरी आणि इतर गंभीर गुन्हे असल्याचे दिसून आले.

सध्या हे दोन्हीही चोर अंधेरी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांनी अशाच प्रकारच्या चोऱ्या किंवा इतर कोणते गुन्हे केले आहेत का या संदर्भात अधिकचा तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Andheri Crime News
Mumbai Cyber Crime: गुन्हेगाराने पोलीस अधिकाऱ्यालाच घातला गंडा; डेबिट कार्डचं पिन सेट करण्याच्या नादात गमावले ४.४९ लाख रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com