Youth Died In Jogeshwari Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: तक्रार करायला गेला अन् परत आलाच नाही, तरुणासोबत पोलिस ठाण्यात नेमकं काय घडलं?

Youth Died In Jogeshwari Police Station: मुंबईच्या जोगेश्वरी पोलिस ठाण्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. जोगेश्वरी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार द्यायला गेलेला २८ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला.

Priya More

संजय गडदे, मुंबई

मुंबईमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जोगेश्वरी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार करायला गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तक्रार करायला गेला आणि तो परत घरीच आला नाही. मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केलेत. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या जोगेश्वरी पोलिस ठाण्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. जोगेश्वरी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार द्यायला गेलेला २८ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. दीपक जाधव (वय २८ वर्षे) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दीपक केटरिंग कामासाठी मुलं आणि मुलींचा पुरवठा करत होता. काम करणाऱ्या मुला-मुलींना वेळेत पगार न मिळाल्यामुळे दीपक आणि त्यांच्यामध्ये वाद झाला होता.

दीपक पोलिस ठाण्यात गेला पण तो परत आलाच नाही. पोलिस ठाण्यात गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मारहाण केल्यामुळे दीपक जाधवचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या बहिणीने केला आहे. रात्री उशिरा नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत दीपकच्या मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दीपकसोबत नेमकं काय घडलं याची माहिती अद्याप समोर आली नाही. पण या घटनेमुळे जोगेश्वरीमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

SCROLL FOR NEXT