Mumbai Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Shocking News : १९ वर्षीय तरुणी रात्री टेरेसवर झोपायला गेली, सकाळी बिल्डिंगखाली मृतावस्थेत आढळली

Young Woman Died In Sewri: शिवडीमध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून पडून तरुणीचा मृत्यू झालाय. टेरेसवर झोपले असता ही तरुणी खाली पडली.

Priya More

सचिन गाड, मुंबई

मुंबईमध्ये एका तरुणीचा झोपेत असताना टेरेसवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या शिवडी परिसरामध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे शिवडीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवडीमध्ये १९ वर्षीय तरुणीचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही तरुणी चौथ्या मजल्यावर राहत होती आणि ती टेरेसमध्ये झोपली होती. त्याचवेळी झोपेतच ती चौथ्या मजल्यावरून खाली पडली. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तात्काळ केईएम रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषीत केले.

कशिष शेख ऊर्फ कशिष कसबे असं या मृत तरुणीचं नाव आहे. पोलिसांनी मुलीच्या आईचा जबाब नोंदवला असून तिची काही तक्रार नसल्याचे म्हटले आहे. तरी देखील पोलिसांनी अपघाती मृत्यची नोंद करत घटनेच्या तपासला सुरूवात केली आहे. ही मुलगी झोपेत असी कशी खाली पडली असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपा युवा नेते राहुल काटकर यांच्या देवपुष्प फाउंडेशनकडून ५१ टन चारा वाटपाचा शुभारंभ

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

SCROLL FOR NEXT