मुंबईची लाईफलाईन म्हणून लोकलची ओळख आहे. या लोकलमध्ये चाकारमान्यांची कायम गर्दी असते. अशावेळी घाईत लोकलमध्ये चढताना किंवा उतरताना तोल जाऊन अनेकवेळा दुर्घटना घडतात. यात काही वेळा प्रवाशांना जीव गमवावा लागतो, तर कधी कायमचं अपांगत्व येतं. मात्र अशी दुर्घटना होताना रेल्वे स्थानकावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या किंवा पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे काहींचे जीव वाचवले देखील जातात. असाच प्रकार मुंबईतील चुनाभट्टी रेल्वे स्थानकावर आज बघायला मिळाला आहे.
मुंबईतील चुनाभट्टी येथे लोकलमधून उतरताना तोल जाऊन पडणाऱ्या महिलेला एक सतर्क महिला पोलीस हवालदाराने वाचवले. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. हा संपूर्ण थरारक प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. महिला हवालदार कैवारी बनून आल्याने त्यांचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चुनाभट्टी येथे आलेल्या एका लोकलमधून उतरत असताना महिला प्रवासीचा ड्रेस हा मागे उभ्या असलेल्या दुसऱ्या महिला प्रवासीच्या बॅगमध्ये अडकला. त्यामुळे उतरताना या महिलेचा तोल गेला. त्याचवेळी लोकल पुढे निघल्याने या महिलेला लोकलमध्ये चढता आले नाही. यावेळी ती लोकलसोबत फरफटली जाऊ लागली. त्याचवेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला पोलीस हवलदार रूपाली कदम यांच्या ही गोष्ट लक्षात आली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रूपाली कदम यांनी सतर्कपणे या महिला प्रवासीकडे धाव घेत तिला लोकलमधून बाहेर काढत तिचा जीव वाचवला. या संपूर्ण घटनेचा थरार रेल्वे स्थानकावर असलेल्या CCTV कॅमेरामध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून या महिला पोलीस हवालदाराचे कौतुक केले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.