Mumai Crime News SaamTv
मुंबई/पुणे

Crime News: संतापजनक! शिक्षकाकडून अल्पवयीन बहिण भावावर अत्याचार, २५ वर्षीय नराधमाला अटक

अरबी व उर्दु शिकण्यासाठी घरी येणाऱ्या शिक्षकाने चार वर्षांचा मुलगा व सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरज सावंत...

Mumbai: अरबी व उर्दु शिकण्यासाठी घरी येणाऱ्या शिक्षकाने चार वर्षाचा मुलगा व सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. जोगेश्वरी पुर्वमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणात पीडित मुलांच्या आईच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर २५ वर्षीय आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. (Mumbai News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर, २०२२ पासून पीडित मुलांना अरबी व उर्दु भाषेचे धडे देण्यासाठी त्यांच्या घरी येत होता. यावेळी घरातील दिवाणखान्यात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने चार वर्षांचा मुलगा व सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याबाबतची माहिती पीडित मुलांच्या आईला मिळाल्यानंतर तिने ओशिवरा पोलिसांकडे तक्रार केली. दा

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी २५ वर्षीय आरोपीला राहत्या घरातून शुक्रवारी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पीडित मुले भाऊ-बहिण असून घरात कोणीही नसल्याचा फायदा उचलून आरोपी पीडित मुलांसोबत अश्लील कृत्य करत होता. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वर मंदिरातील VIP दर्शनसेवा बंद

Biscuit Pudding Recipe: न्यू इयरसाठी घरच्या घरी तयार करा टेस्टी बिस्कीट पुडिंग, वाचा सोपी रेसिपी

Ladki Bahin Yojana: २ महिने संपले पण खात्यात पैसेच नाहीत, लाडक्या बहि‍णींच्या बँकेत चकरा,₹३००० कधी येणार?

Election : निवडणूक लढवायची मग ५०० शब्दात निबंध लिहा, अन्यथा..., आयोगाचा नवा नियम काय?

Potato Chaat Recipe: मुलांना रोजच्या पोळी- भाजीचा कंटाळा आलाय? पाच मिनिटांत करा टेस्टी बटाटा चाट, वाचा सिक्रेट रेसिपी

SCROLL FOR NEXT