Mumbai News  Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai News : आरटीओच्या उन्हाळी तपासणी मोहीम थंडावल्या; खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

Mumbai News Update : उन्हाळी सुटीत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेवर वाढणाऱ्या गर्दीचा ताण जाणवत आहे. अशा काळात आरटीओ कार्यालय आणि पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सवाल्याने अवाजवी भाडेआकारणी करून प्रवाशांची लूट सुरू केली आहे.

Sandeep Gawade

उन्हाळी सुटीत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेवर वाढणाऱ्या गर्दीचा ताण जाणवत आहे. अशा काळात आरटीओ कार्यालय आणि पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सवाल्याने अवाजवी भाडेआकारणी करून प्रवाशांची लूट सुरू केली आहे.

सुटीच्या काळात एसटीसह रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे बुकिंग फुल होते. त्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना खासगी बससेवेकडे वळावे लागते. नियमानुसार खासगी ट्रॅव्हल्सशी प्रासंगिक करारावर प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. नियमाप्रमाणे प्रवाशांची यादी आरटीओकडून मंजूर करून घेणे आवश्यक आहे; परंतु या नियमाकडे खासगी बसचालक दुर्लक्ष करीत आहेत. तसेच प्रवाशांच्या अडचणीचा फायदा घेत खासगी बस चालकांनी तिकीट दरात दुप्पट ते तिप्पट वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे.

आगारातूनच प्रवाशांची पळवापळवी

मुंबईतील अनेक बस स्थानकांबाहेर खासगी बसचालकांचे बुकिंग काऊंटर आहे. या ठिकाणी रस्त्यावर बसचे बेकायदा पार्किंग केले जाते. मात्र, पोलिस आणि आरटीओ प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. अशातच ट्रॅव्हल्सवाल्यांसाठी काम करणाऱ्या दलालांनी थेट एसटी आगारातूनच प्रवाशांची पळवापळवी सुरू केली आहे. त्यामुळे खासगी बसच्या मनमानीविरोधात कारवाईची मागणी होत आहे.

खासगी बस तिकीट दर (२१ एप्रिल)

मुंबई - औरंगाबाद : २,६३०

मुंबई - पुणे : १,९००

मुंबई - नाशिक : १,८००

मुंबई - रत्नागिरी : २,०००

एसटीचे दर रुपयांमध्ये

मुंबई - औरंगाबाद : ८४०

मुंबई - पुणे :५३५

मुंबई - नाशिक : ४००

मुंबई - रत्नागिरी : ५३०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT