Manasvi Choudhary
मोमोजचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. आजकाल सर्वांनाच मोमोज् खायला आवडतात.
मात्र अनेकदा मैद्यापासून बनवलेले मोमोज् अनेकजण खात नाहीत. पोटाच्या आरोग्यासाठी अनेकजण मोमोज खात नाहीत.
यासाठी आज आम्ही तुम्ही हेल्दी आणि टेस्टी गव्हाच्या पिठाचे मोमोज रेसिपी सांगणार आहोत.
मैदा हा पचायला जड असल्याने गव्हाच्या पिठाचे मोमोज् सध्या लोकप्रिय होत आहेत.
गव्हाच्या पीठाचे मोमोज बनवण्यासाठी- गव्हाचे पीठ, मीठ, तेल, पाणी
तर स्टफिंगसाठी- कोबी गाजर, कांदा, आले- लसूण पेस्ट, हिरवी मिरची, सोया सॉस, मिरी पावडर, तेल हे साहित्य घ्या
मोमोज बनवण्यासाठी सर्वात आधी एका परातीमध्ये गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल एकत्र करा. यामध्ये पीठ मळण्यासाठी थोडे पाणी घाला. पिठ मळून झाल्यानंतर त्यावर ओला कपडा लावून ठेवा.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची परतून घ्या. नंतर यात कांदा, कोबी आणि गाजर घालून मध्यम आचेवर परतून घ्या.
नंतर या मिश्रणात मीठ, मिरी पूड आणि सोया सॉस घालून मिक्स करा. अशाप्रकारे मोमोज स्टफिंग रेडी आहे.
मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करा. पुरीसारखी पातळ पारी लाटून घ्या. त्यात स्टफिंग भरून घ्या.
नंतर कडांना थोडे पाणी लावा आणि तुम्हाला आवडेल तो आकार देऊन मोमोज करंजीप्रमाणे बंद करा
गॅसवर मोमोज भांड्यामध्ये चाळणीत थोडे तेल लावा आणि त्यात मोमोज वाफवण्यासाठी ठेवा. भांड्यामध्ये शेवटी उकळण्यासाठी पाणी ठेवा.