Bangladeshi In Chembur Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : मुंबईत बांगलादेशींवर धाड, पाळत ठेवली आणि ७ जणांना बेड्या ठोकल्या

Chembur News : चेंबूरच्या माहूल गाव परिसरामध्ये बांगलादेशी नागरिक अवैध्यपणे राहत होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Yash Shirke

मयूर राणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Chembur News : मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये अवैध्यरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या स्थलांतरीत बांगलादेशींना पकडण्याचे काम सुरु आहे. दरम्यान मुंबईच्या चेंबूरहून बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व नागरिक अवैध्यपणे भारतात राहत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या चेंबूरमध्ये आरसीएफ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. माहूल गाव विभागात अवैध्यरित्या वास्तव्य करणाऱ्या सात बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण मार्च २०२० पासून माहूल गावात एकत्र राहत होते. यात ३ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. हे सर्वजण २५ ते ३५ या वयोगटात असल्याची माहिती समोर आली आहे.

चेंबूरमध्ये अवैध्यरित्या राहणारे आरोपी -

१. सोहंग आशिर मुल्ला, वय २६ वर्ष

२. जाहिदुल इस्लाम ईमुल, वय २६ वर्ष

३. आलामीन शेख, वय २३ वर्ष

४. सुमा जहीगीर आलम तुटूल, वय २४ वर्ष

५. नोयम अफजल हुसेन शेख, वय २५ वर्ष

६. तावमीना अख्तर राजू, वय ३५ वर्ष

७. सलमा मोकसद अली, वय ३५ वर्ष

सात बांगलादेशी नागरिकांना गु.नो. क्रमांक ६१/२०२५, कलम-नियम ३ ह ६ पारपत्र (भारतात प्रवेश) १९५० सह परिच्छेद ३ (१) (अ) परकीय नागरिक आदेश १९४८ सह कलम १४ परकीय नागरिक कायदा १९४६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई, नवीमुंबई, ठाणे यांसारख्या ठिकाणी बांगलादेशी नागरिक अवैध्यरित्या वास्तव्य करत आहेत. हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्याजवळच्या एका नगरसेविकाने बांगलादेशी नागरिकांची माहिती देणाऱ्यांना १,१११ रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

SCROLL FOR NEXT