Threatening Phone Call  Saam Tv
मुंबई/पुणे

Bomb Blast Threat: मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टवर बॉम्बस्फोट घडवणार.. पोलीस कंट्रोल रूमला आलेल्या फोनमुळे खळबळ

Mumbai Police News: या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सहार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सुरज सावंत

Mumbai Crime News: मुंबई आणि दिल्ली डोमेस्टिक एअरपोर्टला बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल दुपारी मुंबई पोलीस कंट्रोल रूमला हा धमकीचा फोन आला होता. या धमकीनंतर कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून राज्यात धमकीचे (Threat) फोन येण्याचे सत्र सुरूच आहे. काल दुपारी मुंबई (Mumbai) आणि दिल्ली (Delhi) डोमेस्टिक एअरपोर्टला बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करत विमानतळ परिसरात बॉम्बस्फोट होऊन मोठी दुर्घटना घडणार अशी धमकी देण्यात आली होती.

या धमकीनंतर पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत दोन्ही विमानतळावर शोध घेतला. मात्र यामध्ये कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळून आली नाही. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सहार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात कलम 506(2) आणि कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक नेत्यांनाही धमकीचे फोन आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी नागपुरातील (Nagpur) पोलीस स्टेशन उडवून देण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली होती. मात्र हा तपासामध्ये हा खोडसाळपणा असल्याचे स्पष्ट झाले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवार गटाचा शिवसेनेला जोरदार धक्का; २००पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai : एका दिवसात मुंबई दर्शन! 'ही' ७ ठिकाणं पाहिलीत तर दिवस बनेल खास

भर मंडपात नवरदेवासह नातेवाईकांना डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न! प्रेमविवाहाचा असा बदला पाहून हादरून जाईल मन

Maharashtra News Live Update: जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात भारताला नंबर वन बनवण्याचे लक्ष्य

First car service: नवी कार घेतल्यानंतर पहिली सर्व्हिसिंग कधी केली पाहिजे?

SCROLL FOR NEXT