मुंबई, ता. ३० ऑगस्ट २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 'ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024' ला हजेरी लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी गेल्या १० वर्षात ५३ कोटी नागरिकांची बँक खाती उघडल्याचे सांगितले, तसेच डिजीटल क्रांतीवरुन विरोधक टीका करत होते, असा टोलाही यावेळी लगावला.
"काही लोकांनी भारतातील फिनटेक क्रांतीबाबत प्रश्न उपस्थित केले. जेव्हा सरस्वती माता बुद्धी वाटत होती, तेव्हा असे लोक वाटेत उभे होते. सध्या भारतात सणासुदीचा काळ आहे. नुकताच जन्माष्टमीचा सण साजरा झाला. लोक इतके खूश आहेत की त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि बाजारावरही झाला आहे," असे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
तसेच "एक काळ असा होता की लोक भारतात यायचे आणि आमची सांस्कृतिक विविधता पाहून आश्चर्य वाटायचे. आता जेव्हा लोक भारतात येतात तेव्हा त्यांना आमची फिनटेक विविधता पाहून आश्चर्य वाटते. विमानतळावर उतरण्यापासून ते खरेदीपर्यंत सर्वत्र भारताची फिनटेक क्रांती दिसून (Global Fintech Fest) येते. गेल्या 10 वर्षांत, फिनटेक क्षेत्रात $31 अब्ज गुंतवले गेले आहेत," अशी माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी भारतातील स्वस्त मोबाईल फोन, डेटा आणि झिरो बॅलन्स जनधन बँक खात्यांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली. "तुम्हाला आठवत असेल की पूर्वी काही लोक संसदेत उभे राहून विचारायचे. जे लोक स्वतःला खूप शिकलेले समजायचे ते विचारायचे. भारतात एवढ्या बँक शाखा, इंटरनेट आणि बँका नाहीत, भारतात वीज नाही, असे म्हणायचे असा टोला त्यांनी लगावला.
"ते म्हणायचे की फिनटेक क्रांती कशी होईल. हे विचारले गेले आणि माझ्यासारख्या चहा विक्रेत्याला हे विचारले गेले. पण आज बघा, अवघ्या एका दशकात भारतात ब्रॉडबँड वापरकर्ते 6 कोटींवरून 94 पर्यंत वाढले आहेत. आज 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणीही भारतीय असेल ज्याची डिजिटल ओळख नाही, म्हणजेच गेल्या 10 वर्षांत 53 कोटींहून अधिक लोक बँकिंग प्रणालीशी जोडले गेले आहेत, असा दावाही त्यांनी केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.