Samir Khan Death:  Saamtv
मुंबई/पुणे

Samir Khan Death: मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे जावई रुग्णालयात दाखल; काही दिवसांपूर्वी झाला होता भीषण अपघात

Samir Khan Death: काही दिवसांपूर्वीच समीर खान यांचा कुर्ला येथे मोठा अपघात झाला होता. या अपघातात समीर खान हे गंभीर जखमी झाले होते.

Gangappa Pujari

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशातच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच समीर खान यांचा कुर्ला येथे मोठा अपघात झाला होता. या अपघातात समीर खान हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र अद्याप त्यांची प्रकृती ठीक नसून उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

१८ सप्टेंबर रोजी मुंबईच्या क्रिटीकेअर रुग्णालयातून रेग्यूलर चेकअप करून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली होती. समीर खान हे कारमध्ये बसत असताना त्यांच्याच गाडीच्या चालकाकडून ॲक्सिलेटर दाबला गेल्याने समीर खान कारसोबत फरफटत गेले. यामध्ये त्यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तात्काळ आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

समीर खान हे गाडीत बसत असतानाच ड्रायव्हरकडून ही चूक झाली आणि गाडी फुल स्पीडने जाऊन भिंतीला आदळली. त्यावेळी कारने चार ते पाच दुचाकीना देखील जोरदार धडक दिली. दरम्यान, या अपघातानंतर समीर खान यांची कार चालवणारा ड्रायव्हर अब्दुल अन्सारी याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT