MPSC Exam Cancelled By TCS Saam Tv
मुंबई/पुणे

MPSC Exam: MPSC ची परीक्षा TCS कडून रद्द, संतप्त होत विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी; नेमकं कारण काय?

MPSC Exam Cancelled By TCS: एमपीएससी परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. टीसीएसकडून ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. संतप्त होत विद्यार्थ्यांनी टीसीएसविरोधात घोषणाबाजी केली आहे.

Priya More

मयूर राणे, मुंबई

MPSC मार्फत लिपिक टंकलेखक पदासाठी घेण्यात येणाऱ्या कौशल्य चाचणी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. टीसीएसकडून ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. आजच परीक्षा घ्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी टीसीएसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पवई येथे या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सध्या परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

MPSC मार्फत आज लिपिक टंकलेखक पदासाठी परीक्षा घेण्यात येणार होती. पण कौशल्य चाचणीमध्ये तांत्रिक अडचण आली. त्यामुळे टीसीएसकडून ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पुढील तारीख लवकर कळवण्यात येईल असे टीसीएसने सांगितले. पण विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम असून परीक्षा आजच झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. परीक्षा रद्द केल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी टीसीएसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

विद्यार्थ्यांनी शांततेत घरी जाण्याचे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. परीक्षांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती टीसीएसकडून देण्यात आली आहे. ही परीक्षा रद्द झाल्यामुळे राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी भरपाईची मागणी केली आहे.

दरम्यान, लिपिक टंकलेखक २०२३ साठी एमपीएससीने १ जुलै ते १३ जुलै कालावधीत कौशल्य चाचणी पवईच्या आयओएन डिजिटल झोन येथे आयोजित केली होती. १ जुलैला सकाळच्या पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. सकाळी ९ ते १० असा परीक्षेचा वेळ होता पण १२ वाजले तरी विद्यार्थ्यांना परीक्षा संपवून बाहेर सोडण्यात आलेले नव्हते. त्यामुळे दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.

दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा ११.३० ते १२.३० या वेळेत होती. पण त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला नाही त्यामुळे विद्यार्थी संभ्रामवस्थेत होते. या परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. अशामध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात गोल्फ क्लब उड्डाण पुलावर दहा गाड्या एकमेकांना धडकल्या

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

SCROLL FOR NEXT