Mouse Found In Siddhivinayak Prasad Saam Tv
मुंबई/पुणे

Siddhivinayak Prasad: तिरूपतीनंतर आता सिद्धिविनायकाच्या प्रसादावरून वाद, लाडूच्या ट्रेमध्ये आढळली उंदराची पिल्ले; धक्कादायक VIDEO

Mouse Found In Siddhivinayak Prasad Viral News: मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात देण्यात येणाऱ्या प्रसादावरून आता वाद निर्माण झाला आहे. प्रसादामध्ये देण्यात येणाऱ्या लाडूच्या ट्रेमध्ये उंदराची पिल्लं आढळून आली आहेत.

Priya More

रुपाली बडवे, मुंबई

Mumbai Siddhivinayak Mandir News Updates: आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरच्या प्रसादामध्ये तूपाऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आली असल्याची घटना समोर आली होती. लाडूच्या प्रसादामध्ये भेसळ केल्याच्या घटनेमुळे सध्या देशभरामध्ये संतापाचे वातावरण आहे. अशामध्येच आता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाचा मुद्दा देखील समोर आला आहे. सिद्धिविनायकाच्या प्रसादाचा हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. प्रसादामध्ये देण्यात येणाऱ्या लाडूच्या पाकिटामध्ये उंदीर आढळून आले आहेत. त्याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धिविनायक मंदिर सातत्याने चर्चेत आहे. अशातच आता सिद्धिविनायक मंदिराबाबत भाविकांना हादरवून टाकणारी गोष्ट समोर आली आहे. भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूमध्ये उंदिर आढळून आले आहेत. प्रसादासाठी देण्यात येणाऱ्या लाडूच्या ट्रेमध्ये उंदरांची पिल्ले आढळून आली आहेत. या उदरांनी लाडूची पाकिटं अक्षरश: कुरतडून त्यामधील लाडू खाल्ल्यांचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की लाडूच्या ट्रेमध्ये उंदराची ७ ते ८ पिल्लं आहेत.

मध्यंतरीच्या काळात अनेक गैरव्यवहाराचे आरोप तत्कालिन सिद्धीविनायक न्यास मंडळावर आणि तत्कालिन कार्यकारी अधिकारी यांच्यावर झाले होते. कायम चर्चेत राहणारे सिद्धिविनायक मंदिर आता या लाडूच्या प्रसादामुळे चर्चेत आले आहे. प्रसादामध्ये उंदराची पिल्ले आढळून आल्याचा व्हिडीओ पाहून भाविकांना मोठा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणालाही किळस आल्याशिवाय राहणार नाही. या घटनेवरून आता संताप व्यक्त केला जात आहे. भाविकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सिद्धीविनायक प्रशासन करत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT