Mmrda orange gate to marine drive twin tunnel project X (Twitter)
मुंबई/पुणे

Mumbai News : एमएमआरडीएच्या ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्पाला सुरुवात, 'मावळा'चा होणार वापर

Mumbai City News : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला सुरवात झाली आहे. या प्रकल्पामध्ये भुयारीकरणासाठी मावळा नावाचे टीबीएम यंत्र सज्ज करण्यात आले आहे.

Yash Shirke

Mumbai : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या दरम्यान दुहेरी बोगदा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या बोगद्यामुळे चेंबूर ते मरीन ड्राईव्ह प्रवास जलदगतीने होणार आहे. बोगद्याच्या ऑरेंज गेट येथील लॉन्चिंग शाफ्टच्या बांधकामाला सुरवात झाली आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएला जागा उपलब्ध करुन दिल्याने प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. सप्टेंबर महिन्यापासून प्रकल्पातील भुयारीकरणाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे. यानुसार एल. ॲण्ड टी.च्या ‘मावळा’ नावाच्या टीबीएम यंत्राद्वारे भुयारीकरण सुरु केले जाणार आहे.

चेंबूर-सीएसएमटी प्रवास पूर्वमूक्त मार्गामुले २० ते २५ मिनिटांमध्ये पार करता येतो. मात्र तेथून पुढे मरीन ड्राईव्ह, चर्चगेटकडे जाताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हा वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला. या बोगद्यासाठी ९१५८ कोटी रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज आहे. दुहेरी बोगद्यावरुन येणाऱ्या वाहनांना मुंबई पश्चिम उपनगरांच्या दिशेला जाणे सोपे होईल.

एमएमआरडीएच्या दुहेरी बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. ऑरेंज गेट येथील शाफ्टच्या बांधकामाकरीता मुंबई बंदर प्राधिकरमाची ४.३ हेक्टर जागा आवश्यक आहे. यातील ५० टक्के जागा ताब्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली आहे. या जागेसाठी एमएमआरडीएला ८५०० कोटी रुपये द्यावे लागणार असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई बंदर प्राधिकरणाची एक हेक्टर जागा एमएमआरडीएच्या ताब्यात आली होती. या जागेवर लाॅन्चिंग शाफ्टच्या बांधकामाला सुरुवात झाली. आता एकूण जागेपैकी ५० टक्के जागा उपलब्ध झाल्याने कामाला वेग येणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान मावळा टीबीएमची दुरुस्ती झाली असून ते यंत्र भुयारीकरण करण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's horoscope: शुक्रवार शुभ! श्रवण नक्षत्र आणि शुभ योगाचा संयोग; ‘या’ राशींचं भाग्य जबरदस्त चमकणार

Todays Horoscope: 'या' राशींसाठी दिवाळीची सुरुवात दणक्यात होणार; वाचा आजचं राशीभविष्य

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ

Pune Police: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कुणाची कुठे झाली बदली? वाचा संपूर्ण लिस्ट

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

SCROLL FOR NEXT