Dharavi Kamla Nagar Fire Saam TV
मुंबई/पुणे

Dharavi Fire : धारावीच्या झोपडपट्टीत भीषण आग; २५ हून अधिक घरं जळून खाक, अग्निशमन दलाचे २६ बंब घटनास्थळी

मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

Satish Daud

रुपाली बडवे, साम टीव्ही

Dharavi Kamla Nagar Fire : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत आतापर्यंत २५ हून अधिक घरं जळून खाक झाल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. (Latest Marathi News)

अग्निशमन दलाच्या २६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धारावीच्या शाहूनगर परिसरात असलेल्या कमला नगरचा झोपडपट्टीमध्ये भीषण आग लागली.

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली. अचानक आग लागल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केलं. त्यामुळे परिसरातील 25 हून अधिक घरं आगीच्या भक्ष्यस्थानी आली. आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आलं.

घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे २५ ते २६ बंब घटनास्थळी दाखल झाले. अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

अद्यापही ही आग आटोक्यात आली नसून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीत २५ हून अधिक घरं जळून खाक झाल्याची माहिती आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

SCROLL FOR NEXT