Atal Setu Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Atal Setu: अटल सेतूवर कार थांबवली अन् समुद्रात उडी मारली; घटना CCTV मध्ये कैद

Man Suicides By Jumping From Atal Setu Mumbai Updates: अटल सेतूवरून एका व्यक्तीने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांकडून या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

Priya More

सचिन गाड, मुंबई

Mumbai Latest News Updates in Marathi: अटल सेतूवरून ४० वर्षांच्या व्यक्तीने समुद्रामध्ये उडी मारली. अटल सेतूवर कार पार्क करून या व्यक्तीने समुद्रात उडी मारली. घटनेची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. समुद्रात उडी मारलेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. पोलिस या कारच्या मदतीने ही व्यक्ती नेमकी कोण आहे? याचा शोध घेत आहे. काही दिवसांपूर्वी अटल सेतूवरून उडी मारत पुण्याच्या बँकरने आत्महत्या केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अटल सेतू ८.५ किमी येथे एका व्यक्तीने समुद्रामध्ये उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या व्यक्तीने अटल सेतूवर आपली कार उभी करून समुद्रात उडी मारली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ वरिष्ठ पोलस निरीक्षक, ठाणे अमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी उडी मारलेल्या व्यक्तीची लाल रंगाची कार उभी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटल सेतू नियंत्रण कक्ष येथील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता ही घटना सकाळी ९.५७ च्या सुमारास घडल्याचे दिसून आले. घटनास्थळी रेस्क्यू टीम आली असून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना संबंधित माहिती देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT