CM Eknath Shinde Visit Landslide Prone Areas Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO : CM एकनाथ शिंदें ऑन द स्पॉट! दरडींचा धोका असलेल्या ठिकाणी थेट पाहणी

CM Eknath Shinde Visit Landslide Prone Areas: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी घाटकोपरच्या असल्फा भागातील हनुमान टेकडी परिसराची पाहणी केली.

Priya More

मुंबईतील दरड प्रवण भागांची (landslide prone areas) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पाहणी केली. मुख्यमंत्र्यांकडून मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून मान्सूनपूर्व कामांची माहिती घेतली. घाटकोपर (Ghatkopar) येथील असल्फा भागातील हनुमान टेकडी परिसरात आज मुख्यमंत्र्यांनी पाहणी दौरा केला. हा पाहणी दौरा दरडग्रस्त भागातील होता.

पावसाळ्यामध्ये मुंबईमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे सतर्कतेचा एका भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी आज हा पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'मुंबईमध्ये अतिधोकादायक ३१ ठिकाणं आहेत. याठिकाणी सेफ्टी नेट लावण्याचे काम सुरू आहे. मुंबईत अशाप्रकारे दरड कोसळून जीवितहानी होऊ नये यासाठी सेफ्टी नेट लावण्यात येत आहे. ही सेफ्टी नेट स्वित्झर्लंडवरून आणण्यात आली आहे. हे काम मोठ्या कंपनीला दिले आहे. यामुळे येणाऱ्या काळात होणारे मोठे अपघात टळतील.', असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT