Sakinaka Police  Saam TV
मुंबई/पुणे

Lalit Patil Case Update: ललित पाटील प्रकरणात मोठी घडामोड, पोलिसांकडून १७ वा आरोपी अटकेत; धक्कादायक कनेक्शन उघड

Kurla Latest News: अमीर अतीक शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला साकीनाका पोलिसांनी कुर्ला परिसरातून अटक केली आहे.

Gangappa Pujari

संजय गडदे, प्रतिनिधी

Lalit Patil Case:

ललित पाटील आणि एम डी ड्रग्ज प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. साकीनाका पोलिसांनी या संदर्भात मोठी कारवाई करत 17 व्या आरोपीला अटक केली. अमीर अतीक शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला साकीनाका पोलिसांनी कुर्ला परिसरातून अटक केली आहे.

पुणे पोलिसांनी (Pune) ससून रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा साठा जप्त केल्यानंतर एमडी ड्रग्स प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात पुणे पोलीस आणि साकीनाका पोलिसांनी आतापर्यंत एकूण 17 आरोपींना अटक केली. या प्रकरणातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे.

ललित पाटील (Lalit Patil) याला ही फॅक्टरी उभी करण्यास आर्थिक मदत करणारा आणि फॅक्टरीत तयार होणारे एमडी ड्रग्स मुंबई शहराला पुरवठा करणारा आरोपी अमीर अतीक शेख याला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता त्याला 30 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

साकीनाका (Sakinaka) पोलिसांनी आरोपी अमीर अतीक शेख याला अटक करून आज अंधेरी (Andheri) महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता आरोपी अमीर शेख याच्यावतीने बाजू मांडणाऱ्या वकिलाने शॉर्ट पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली. मात्र सरकारी वकील सिद्धार्थ बागले यांनी आरोपीच्या वकिलांचा हा युक्तिवाद खोडून काढला.

आरोपी अमीर शेख हा ललित पाटील याला फॅक्टरी सुरू करण्यासाठी आर्थिक मदत पुरवणारा आरोपी असून फॅक्टरीमध्ये तयार झालेले एमडी ड्रग्स ललित कडून खरेदी करून तो त्यावर प्रक्रिया करून मुंबईत विक्री करत होता, यामुळे यात अजूनही काही आरोपींची नावे पुढे येण्याची शक्यता असल्याने त्याला जास्तीत जास्त दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील सिद्धार्थ बागले यांनी केली. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SBI कस्टमर्स सावध व्हा, फेक मेसेज फिरतोय, चुकूनही हे काम करू नका

'भारताला तर पाकिस्तानही हरवेल...' टीम इंडियावर Wasim Akram ची जहरी टीका

Chandra Gochar 2024: 'या' ३ राशींचा गोल्डन टाईम संपला; चंद्राच्या गोचरमुळे अडचणीत होणार वाढ

Homemade Snacks Quick Recipe: पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आलाय? मग नाश्त्याला 'या' युनिक रेसिपी नक्की ट्राय करा

UP Madrasa Act : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; UP मदरसा अ‍ॅक्टला मान्यता, 17 लाख विद्यार्थ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT