Engineer Ends Life In Pimpari Chinchwad Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: IIT बॉम्बेमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलच्या इमारतीवरून मारली उडी

IIT Bombay Student End Life: मुंबईतल्या आयआयटी बॉम्बेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारत आयुष्य संपवले. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Priya More

Summary -

  • आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थ्याने आत्महत्या केली

  • हॉस्टेलच्या इमारतीवरून मारली उडी

  • विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली

  • पोलिसांकडून तपास सुरू

वैदेही कानेकर, मुंबई

मुंबईतल्या पवईमधील आयआयटी बॉम्बेमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारून या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं. नैराश्येतून या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घनटेमुळे बॉम्बे आयआयटी परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवईत आयआयटी बॉम्बेमध्ये धक्कादायक घटना घडली. याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या तरुणानं नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं. या विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा जास्त रक्तस्राव होऊन मृत्यू झाला. शिक्षणाच्या तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. विद्यार्थ्याच्या कुटुंबींयाना घटनेची माहिती देण्यात आली आहे. या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे पवई आयआयटी बॉम्बेमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर पोलिस सध्या तो हॉस्टेलमधील ज्या खोलीत राहत होता त्या खोलीमध्ये तपासणी करत आहेत. या विद्यार्थ्याचा मोबाईल, लॅपटॉप, त्यांच्या रुममधील वस्तू यांची तपासणी पोलिस करत आहेत. ऑगस्ट २०२५ मध्ये देखील एका विद्यार्थ्याने अशाच पद्धतीने आत्महत्या केली होती. या शिक्षण संस्थेत विद्यार्थी आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT