Goregaon -Mulund Link Road Project Saam TV
मुंबई/पुणे

GMLR Phase 3: गोरेगाव- मुलुंड लिंक रोडमुळे प्रवास होणार सुसाट, ५० मिनिटं वाचणार; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Goregaon-Mulund Link Road Project Advantages: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे भूमिपूजन होणार आहे. गोरेगावमधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये शनिवारी संध्याकाळी ५ वाजता हा भूमिपूजन कार्यक्रम पार पडणार आहे.

Priya More

मुंबई महानगर पालिकेचा (BMC) महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे (Goregaon -Mulund Link Road) लवकरच भूमिपूजन होणार आहे. येत्या १३ जुलैला म्हणजे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे भूमिपूजन करणार आहेत. गोरेगावमधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये शनिवारी संध्याकाळी ५ वाजता हा भूमिपूजन कार्यक्रम पार पडणार आहे. गोरेगाव- मुलुंड लिंक रोड हा प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या भूमिपूजनामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या कामाला वेग येणार आहे.

या प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत ४.७ किमी लांबीचे जुळे बोगदे बांधले जाणार आहेत. या बोगद्याद्वारे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांवर येणार आहे. गोरेगाव- मुलुंड लिंक रोड तयार झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार असून त्यांच्या प्रवासाची ५० मिनिटं वाचणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शनिवारी गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात या जुळ्या बोगद्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याशिवाय एमएमआरडीएतर्फे उभारण्यात येत असलेल्या ठाणे-बोरिवली बोगद्याच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. हा ११.८५ किमी लांबीचा जुळा बोगदा आहे. ज्यामध्ये एकूण सहा लेन असणार आहेत.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पांतर्गत बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ४.७ किमी लांब आणि ४५.७० मीटर रुंद असे जुळे बोगदे बांधले जाणार आहेत. ॲप्रोच रस्ते आणि इतर जोडणारे पैलू जोडल्यास एकूण लांबी ६.६५ किमी होईल. हे जुळे बोगदे जमिनीखाली २० ते १६० मीटर खोलीवर असणार आहे. दोन्ही बोगदे ३००-३०० मीटर अंतरावर जोडले जातील. सुमारे १४.२ मीटर व्यासाच्या टनेल बोरिंग प्लांटद्वारे बोगदा खोदला जाईल. या बोगद्यात आधुनिक प्रकाश व्यवस्था, वेंटिलेशन यंत्रणा, अग्निसुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही, बोगद्याच्या दोन्ही बाजूला नियंत्रण कक्ष यांचा समावेश असणार आहे.

स्टॉर्म वॉटर ड्रेनेज लाईन आणि भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी संभाव्य लाईन्स यासारख्या उपयुक्तता वाहिन्यांसाठी बोगद्यांच्या तयार केले जाईल. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच आरे, विहार आणि तुळशी तलावातील वनस्पती आणि जीवजंतूंना नुकसान न पोहचवता हा बोगदा बांधला जाईल. प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कोणतेही भूसंपादन होणार नाही. प्राण्यांच्या सुरक्षित हालचालीसाठी मार्ग तयार केला जाईल.

महत्वाचे म्हणजे, या बोगद्यामुळे मुंबईत दरवर्षी सुमारे २२ हजार ४०० टन कार्बन उत्सर्जनात घट होईल. त्याचसोबत गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ आणि इंधनही वाचणार आहे. जुळ्या बोगद्यांच्या बांधकामाचा अंदाजे एकूण खर्च ६३०१.०८ कोटी रुपये असेल. जुळ्या बोगदा पूर्ण होण्याची अंदाजे ऑक्टोबर २०२८ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी २३ मजली ७ बिल्डिंग आणि ३ मजली मार्केटचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १२.२० किमी आहे. ज्याच्या डिझाइनचे काम प्रगतीपथावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

Politics : आगामी निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्याला जोरदार झटका, मुलाने स्थापन केला वेगळा पक्ष

SCROLL FOR NEXT