Mumbai News: दिलासादायक! गोरेगाव ते कांदिवलीदरम्यानची सहावी मार्गिका कधी सुरु होणार? महत्वाची अपडेट आली समोर

Western Railway News: मुंबईसह मुंबईउपनगरातील हजारो प्रवाशी दररोज लोकल ट्रेनने प्रवास करत असतात. सध्या लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Mumbai News
Mumbai Newssaam tv

मुंबईसह मुंबईउपनगरातील हजारो प्रवाशी दररोज लोकल ट्रेनने प्रवास करत असतात. सध्या लोकलने (Local) प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच गोरेगाव ते कांदिवली दरम्यानची सहावी मार्गिका सुरु होणार आहे. याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास आणखी सोयीस्कर होणार आहे.

Mumbai News
Mumbai News : मुंबईतील ३२,६५८ रिक्षा चालकांचे वाहन परवाने होणार निलंबित; मोठं कारण आलं समोर

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना गोरेगाव ते कांदिवली(Kandivali) दरम्यानची सहावी मार्गिका सुरु होणार असून त्यासोबत पश्चिम रेल्वे १५ मेपर्यंत आणखी काही एसी लोकल घेणार असल्याचे समजते. यामुळे प्रवाशांना उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

वरिष्ट अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव ते कांदिवली असा ४.५ किमी लांबीचा मार्ग जवळपास तयार झालेला आहे. शिवाय त्या मार्गातील जमीन अधिग्रहणातील अडचणींचे निवारण पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. असे झाल्यास बोरिवलीपर्यंतचा सहावा मार्ग यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. खार ते गोरेगाव अशी सहावी सहावी मार्गिका नोव्हेंबर गेल्यावर्षी सुरु करण्यात आली. सहावी मार्गिका बोरिवली पर्यंत सुरू झाल्यास पश्चिम रेल्वेची प्रवासी क्षमता २० टक्क्यांनी वाढणार आहे.

काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता...

गोरेगाव ते कांदिवली दरम्यानच्या एका प्रलबिंत कामाचे पू्र्ण झाले आहे. त्याशिवाय १२ पुलांपैकी ८ लहान पुलांचे काम पूर्ण झाले असून काही राहिलेल्या ४ पुलांचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामध्ये काही सिग्नलगचे ७० टक्केआणि ओव्हरहेड ३० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे समजते. शिवाय बोरिवली ते मुंबई सेंट्रल दरम्यान ३० किमीची सहावी मार्गिका तयार करण्यात येत आहे. या मार्गिकेत लोकल या मेल - एक्स्प्रेस गाड्यांपासून वेगळ्या राहण्यासाठी पाचवी आणि सहावी मार्गिका तयार केली जात आहे.

एसी लोकला प्रवाशांची पंसती

सध्या मुंबईतील एसी लोकल सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. साधारण सात वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेवर पहिली एसी लोकल धावली.सध्या एसी लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर दररोज ९६ तर मध्य रेल्वेवर ६६ एसी लोकल धावत आहेत.

Mumbai News
Navi Mumbai News : APMC चे संचालक संजय पानसरे यांना अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com