Mumbai News : मुंबईतील ३२,६५८ रिक्षा चालकांचे वाहन परवाने होणार निलंबित; मोठं कारण आलं समोर

Mumbai Transport : रिक्षाचालक अनेकदा प्रवाशांशी मुजोरीने वागतात, अरेरावी करतात. हे वागणं रिक्षाचालकांना चांगलंच महागात पडलं आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेल्या १५ दिवसांच्या विशेष मोहिमेत भाडे नाकारणाऱ्या ३,२६५८ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
Mumbai News
Mumbai NewsSaam Tv
Published On

रिक्षाचालक अनेकदा प्रवाशांशी मुजोरीने वागतात, अरेरावी करतात. हे वागणं रिक्षाचालकांना चांगलंच महागात पडलं आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेल्या १५ दिवसांच्या विशेष मोहिमेत भाडे नाकारणाऱ्या ३,२६५८ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर अन्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणात रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. भाडे नाकारणाऱ्या ३२६५८ वाहनांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली 

जादा प्रवासी, भाडे नाकारणे आदी कारणांसाठी वाहतूक पोलिसांनी केली आहे. तसेच यापुढे ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे वाहतूक  विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.मुंबईतील रेल्वे स्थानके, मॉल, बस स्थानके तसेच इतर ठिकाणी लांब पल्ल्याचे भाडे मिळविण्यासाठी रिक्षाचालक जवळचे भाडे नाकारतात. तसेच जादा भाड्याची मागणी केली जाते. याबाबतच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे येत होत्या. त्याचबरोबर चालक गणवेश परिधान करीत नाहीत, बॅच तसेच इतर कागदपत्रे बाळगत नाहीत, नियमांचे उल्लंघन करतात अशाही तक्रारी येत होत्या.

Mumbai News
Thane Lok Sabha: ठाणे लोकसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी 43 नामनिर्देशनपत्रांचे वाटप, जाणून घ्या संपूर्ण माहिती

या तक्रारींची गंभीर दखल घेत बेशिस्तचालकांना धडा शिकविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ८ एप्रिल ते २२ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली. तक्रारी आलेल्या सर्व ठिकाणी १५ दिवसांत वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले. रिक्षाचालक भाडे नाकारताना दिसल्यास त्याच ठिकाणी चालकावर कारवाई करण्यात येत होती. १५ दिवसांत ३,२६५८ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. विनागणवेश ५२६८, जादा प्रवासी वाहतूक करणे ८६५० व इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५६१३ अशा एकूण ५२१८९ इ -चलान कारवाई करण्यात आली.

Mumbai News
Mumbai Local Train Mega Block: रविवारी मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक या मार्गावरून वळवण्यात आलीय लोकल सेवा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com