Mumbai News  Saam Tv
मुंबई/पुणे

Political News: 'मातोश्री'बाहेर शिंदे-फडणवीस सरकारची बॅनरबाजी, मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी जय्यत तयारी

मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आल्याचं दिसत आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> निवृत्ती बाबर

मुंबई: मुंबईतील विविध विकास कामांच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारी रोजी मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकार आपलं शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहे. मुंबई जय्यत तयारी सुरु आहे. मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आल्याचं दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जानेवारीला मुंबईत येत आहे. मुंबईत मोदींच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन होणार आहे. यासाठी अनेक पोस्टर्स मुंबईतील विविध भागात लावण्यात आले आहे. असेच मोठे मोठे बॅनर्स वांद्रे येथील कलानगर जंक्शन येथील उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर देखील लावण्यात आले आहेत.

कलानगर येथील रस्त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठमोठे कटआऊट्स लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स मुंबईकरांच लक्ष वेधून घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update : भगवान गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा

Prajakta Mali: जांभळ्या साडीत प्राजक्ताचं मराठमोळ सौंदर्य...

Jalgaon : मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा तलावात बुडून मृत्यू; जळगांवच्या मेहरूण तलावातील घटना

Munawar Farooqi: मुनव्वर फारुकीला जीवे मारण्याचा प्लॅन, दिल्लीतून दोन शूटर्सना अटक; पोलिसांनी सांगितला संपूर्ण प्रकार

निलेश घायवळचा नवा प्रताप! त्याच्या अन् बायकोच्या नावे ४ मतदान ओळखपत्र, एक पुण्यात तर दुसरे नगरमध्ये; नावात बदल करत...

SCROLL FOR NEXT