Mumbai News Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai News : मुंबई विमानतळावर DRI ची मोठी कारवाई; विदेशी नागरिकाने गिळल्या होत्या ९.७५ कोटींच्या कॅप्सूल

Mumbai Crime News : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (DRI) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठी कारवाई करत ९.७५ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी ब्राझिलच्या नागरिकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Sandeep Gawade

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (DRI) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठी कारवाई करत ९.७५ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी ब्राझिलच्या नागरिकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे या विदेशी नागरिकांने कोकेनने भरलेल्या ११० कॅप्सुल गिळल्या होत्या. त्याच्याकडून एकूण ९७५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आलं आहे.

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना ब्राझिलची व्यक्ती अमली पदार्थ घेऊन मुंबई विमानतळावर येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांना विमानतळावर तपासणी करत असताना एक व्यक्ती संशयास्पद आढळून आली. अधिकाऱ्यांना लागलीच त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. पण त्याने सुरुवातीला आपल्याकडे अशी कोणतीही वस्तू नाही नसल्याचं सांगितलं. मात्र कसून चौकशी केल्यानंतर त्यांने अमली पदार्थ आणल्याची कबूली दिली.

धक्कादायक म्हणजे त्याने अमली पदार्थाच्या कॅप्सूल गिळल्याची कबूली दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याला जेजे रुग्णालयात दाखल केलं आणि शस्त्रक्रीया करून कप्सूल बाहेर काढल्या. ११० कॅप्सूल त्याने पोटात दडवल्या होत्या. हे पाहून अधिकारीही चक्रावले. ९७५ ग्रॅम वजनाच्या या या कॅप्सूलची किंमत जवळपास ९.७५ कोटी आहे. पोलिसांनी हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. यामागे अजून कोण कोण सामिल आहेत? कुठे कुठे पाठलं जात होते, याची चौकशी DRI कडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाची बातमी! शिपाई ते अधिकारी, कोणाचा पगार कितीने वाढणार?

Pune : पुणेकरांचा प्रवास आता होणार आरामदायक! तब्बल ३० वर्षांनंतर पुण्यात धावणार डबल-डेकर बस

Rice and belly fat gain: भात खाल्ल्यानं खरंच तुमच्या पोटाचा घेर वाढतोय? तज्ज्ञांनी सांगितलं तुमचं नेमकं चुकतं कुठं?

Accident News : दैव बलवत्तर! पिकअपची जोरदार धडक, स्कूल बसमध्ये आरपार घुसल्या लोखंडी सळ्या

SCROLL FOR NEXT