Mumbai Police Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईत ६ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी, नेमकं कारण काय?

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Police News:

मुंबईत ६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, मिरवणूक काढणे, जमाव करुन ध्वनिवर्धकाचा, सांगितीय बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ आणि विवाह प्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सामाजिक मेळावे, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणारे कार्यक्रम यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलीसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी आदेशान्वये कळविले आहे. (Latest Marathi News)

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १० फेब्रुवारीपर्यंत मांजा वापरावर बंदी

दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत माणसांना व पक्ष्यांना होत असलेली दुखापत, वीज वाहिन्या व सबस्टेशनवर फ्लॅश ओव्हर होऊन वीज पुरवठा खंडित होणे, धाग्यांमुळे गटारे, ड्रेनेज लाईन तुंबणे आदी समस्यांवर नियंत्रण आणण्यासाठी फौजदारी दंड प्रक्रिया संहीता, 1973 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 10 फेब्रुवारी २०२४ च्या मध्यरात्री पर्यंत प्लॅस्ट‍िकपासून बनविलेला नायलॉन मांजा, कोणत्याही कृत्रिम पदार्थांच्या वापरामुळे पक्षांना व माणसांना गंभीर इजा होतात अशा पदार्थांच्या वापराला, विक्रीला व साठवणुकीवर बंदीचा आदेश जारी केला आहे.

मांजा किंवा नायलॉन धाग्यांमुळे दुर्मिळ आणि लुप्तप्राय प्रजाती म्हणून वर्गीकृत केलेल्या पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी मांजावरील बंदी आवश्यक आहे. मांजा किंवा सिंथेटिक धाग्यामुळे अनेकदा वीज वाहिन्या व सबस्टेशनवर फ्लॅश ओव्हर होतो. ज्यामुळे ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होतो, अपघात होतात, वन्यजीवांना दुखापत होऊ शकते त्यामुळे अशा धाग्यांचा वापर टाळणे आवश्यक आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये दंडनीय असेल, असे पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT