CM Eknath Shinde Speech Saamtv
मुंबई/पुणे

Eknath Shinde News: 'हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी...' देवरांच्या पक्षप्रवेशानंतर CM शिंदेंचा इशारा; ठाकरेंवर प्रहार

Milind Deora Join Shivsena Shinde Group: ५६ वर्ष कॉंग्रेससोबत असलेले नेते, माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

सुरज सावंत

Cm Eknath Shinde Speech:

आजपासून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात होत आहे. अशातच महाराष्ट्रात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून ५६ वर्ष कॉंग्रेससोबत असलेले नेते, माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

 मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत जोरदार फटकेबाजी केली.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

"मिलिंद देवरा (Milind Deora) हे सपत्नीक आले आहेत. कुठल्याही पुरूषाच्या मागे महिलांची ताकद आहे. आपण ज्या भावना व्यक्त करत होतात. एका वर्षापूर्वी माझाही मनात त्याच भावना होत्या. मी ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी श्रीकांतच्या आईला विश्वासात घेतलं. मी ही दीड वर्षापूर्वी डाॅक्टर नसताना एक ऑपरेशन केलं साधा टाकाही बसला नाही," असा टोला शिंदेंनी लगावला.

हा फक्त ट्रेलर, चित्रपट अभी बाकी...

"तुम्ही म्हणालात की काही प्रमुख नेत्याचा प्रवेश होईल, हा तर ट्रेलर आहे चित्रपट अभी बाकी आहे. माझा डिप क्लिन ड्राईवर अनेक टिका करतात, हे चहलचं (मुंबई आयुक्त, इक्बालसिंह चहल) काम आहे असं म्हणतात, मात्र मी गेल्याने चहलही पाण्याचा पाईप हातात धरतात," असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) काढला.

ठाकरेंवर घणाघात..

"काही लोकं श्रीकांतच्या मतदार संघात गेले. यांना साफ करा म्हणतात, बाहेर पडणाऱ्यांना कोण साफ करत नाही, घरी बसणाऱ्यांना साफ करतात. मी दीड वर्षात एकही सुट्टी घेतली नाही, गावी गेलो तरी शेती करतो, काही जण बोलतात, शेतकरी हॅलिकाॅप्टरने कसा जातो. मी जातो शेती करतो, फोटोग्राफी नाही करत," असा टोलाही उद्धव ठाकरेंना यावेळी लगावला. तसेच जितके आमच्यावर बोलतील तितके खड्यात जातील, असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

SCROLL FOR NEXT