Maharashtra Politics: वंचितचं ठरलं! 'इंडिया आघाडी'शी युती न झाल्यास सर्व लोकसभा स्वतंत्र लढणार?

Vanchit Bahuhan Aaghadi: वंचित बहुजन आघाडी ही प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वर्धा लोकसभेसह इतर जगाही स्वातंत्र लढणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी व्यक्त केले आहे.
Vanchit Bahuhan Aaghadi
Vanchit Bahuhan AaghadiSaamtv
Published On

चेतन व्यास, वर्धा|ता. १४ जानेवारी २०२४

Wardha News:

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे. वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीला जागा वाटपाचा फॉर्मुला दिला आहे. या फॉर्मुल्यावर जर सकारात्मक निर्णय झाला नाहीतर वंचित बहुजन आघाडी ही प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वर्धा लोकसभेसह इतर जगाही स्वातंत्र लढणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी व्यक्त केले आहे.

काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा?

"सध्या देशात लोकशाहीची हत्या केली जातं आहे. शेतकरी, सामान्यसह युवकांचे विविध प्रश्न प्रलंबित असतांना केंद्र व राज्य सरकार हे फक्त धार्मिक भावनांचा माध्यमातून राजकारण करत आहे. यामुळे यांना धडा शिकविण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे," असे मत वंचितचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा (Nilesh Vishwakarma) यांनी व्यक्त केले.

सर्व जागा स्वतंत्र लढणार?

तसेच 'इंडिया' आघाडीला (India Aaghadi) प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपाचा फॉर्मुला दिला आहे पण अद्याप यावर निर्णय झाला नाही. इंडिया आघाडीशी सकारात्मक चर्चा सुरु आहे तसे न झाल्यास आमचा प्लान बी तयार असून वर्धा लोकसभेसह इतरही जागा स्वतंत्र लढणार आहे. प्रत्येक मतदार संघात वंचितच्या वतीने उमेदवारची चाचपणी सुरु आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vanchit Bahuhan Aaghadi
Manoj jarange Patil: 'मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी भुजबळांची चौकशी करावी अन्यथा...' जरांगे पाटलांचा इशारा

अमरावतीत प्रकाश आंबेडकरांची सभा...

अमरावती शहरात येत्या 20 जानेवारीला प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला तीन लाखांच्या जवळपास नागरिकांची उपस्थिती राहणार आहे. सोबतच वर्धा आणि अमरावती जिल्हे लागून असल्याने व अमरावती जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ हे वर्धा लोकसभा मतदारसंघात येत असल्याने वर्धेतीलही कार्यकर्ते सभेला उपस्थित राहणार आहेत. ही सभा विदर्भाच्या कार्यकर्त्यांची ताकद दाखवणारी ठरेलं असंही विश्वकर्मा यांनी यावेळी सांगितले आहे. (latest Marathi News)

Vanchit Bahuhan Aaghadi
Milind Deora Resign: मिलिंद देवरांचा पक्षाला 'रामराम', कॉंग्रेसच्या गोटात खळबळ; बाळासाहेब थोरात म्हणाले; 'निर्णय दुर्दैवी...'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com