दिल्लीतील थंडी जीवघेणी ठरत आहे. थंडीमुळे दोन घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. तर दुसर्या एका ठिकाणी दोन जणांचा थंडीने मृत्यू झाला आहे.
पहिल्या घटनेत एका कुटुंबाने स्वतःला थंडीपासून वाचवण्यासाठी घरात चुल पेटवली होती. चूल सुरु ठेवून हे कुटुंब झोपी गेलं होते. दरम्यान चूल सुरु असल्याने खोलीत सर्वत्र धूर पसरला. या धुरामुळे कुटुंबातील चार जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. दिल्लीतील खेडा भागात ही घटना घडली आहे.
पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दोन मुलांपैकी एकाचे वय ७ वर्षे आणि दुसऱ्याचे ८ वर्षे आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, शेकोटी पेटवण्यासाठी त्यांनी कोळसा किंवा लाकडाचा वापर केला होता. कोळसा आणि लाकूड जाळल्याने कार्बन मोनोऑक्साइड बाहेर पडतो. याशिवाय अनेक विषारी वायू बाहेर पडतात. बंद खोलीत कार्बन मोनॉक्साईड वाढते आणि त्याचा मेंदूवर परिणाम होतो. ऑक्सिजन कमी झाल्यामुळे गुदमरल्यासारखे होते, ज्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो. हीच परिस्थिती या कुटुंबासोबत झाली असावी. (latest Weather update)
दुसरीकडे, इंद्रपुरीमध्ये शेकोटी पेटवून झोपलेल्या दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. दोघेही बेशुद्ध अवस्थेत सापडले, मात्र त्यांना वाचवता आले नाही. मृतांपैकी एकाचे वय 56 तर दुसऱ्याचे वय 22 वर्ष होते. दोघेही मूळचे नेपाळी आहेत. पोलिसांनी सहाही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.