High Court Imposed 2 Crores Fine To Victim Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai High Court: पीडित आणि आरोपीमध्ये कोर्टाबाहेर तडजोड, हायकोर्टाने थेट ठोठावला २ लाखांचा दंड

High Court Imposed 2 Crores Fine To Victim: बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी आलेल्या आरोपी आणि पीडितेला मुंबई हायकोर्टाने प्रत्येकी २ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कारणही आले समोर....

Priya More

सचिन गाड, मुंबई

बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी आलेल्या आरोपी आणि पिडीतेला मुंबई हायकोर्टाने थेट २ लाखांचा दंड ठोठावल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी आणि पीडित महिलेची कोर्टाबाहेर तडजोड झाली. आरोपीने पीडितेला तडजोड करत पैसे देण्यास होकार दिला. त्यानंतर कोर्टानेच दोघांना देखील दंड ठोठावला. जर दंडाची रक्कम दिली नाही तर हा खटला असाच सुरू राहिल असं देखील कोर्टाने दोघांना खडसावून सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी आलेल्या आरोपी आणि पीडितेला मुंबई हायकोर्टाने प्रत्येकी २ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही दंडाची रक्कम सैनिकांसाठी वापरण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे. पीडित आणि आरोपीमध्ये कोर्टाबाहेर झालेल्या तडजोडीची दखल घेत बलात्काराचा गुन्हा रद्द केला. आरोपीने पीडित महिलेला तडजोडीअंती १.७५ कोटी रुपये देण्याच मान्य केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर हायकोर्टाने या दोघांनही दंड ठोठावला. दंडाची रक्कम जखमी झालेल्या किंवा शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या कल्याण निधीत जमा करण्याचे हायकोर्टाने दोघांना निर्देश दिले.

आरोपी आणि पीडितेने जर दंडाचे पैसे न भरल्यास खटला पुन्हा सुरू करण्याचे हायकोर्टाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. आरोपीने गुंतवणुकीसाठी घेतलेले पैसे परत न केल्याने पीडितेने त्याच्याविरोधात तक्रार करत गुन्हा नोंदवला होता. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. आरोपी आणि पीडितेला हायकोर्टाने ठोठावलेल्या दंडाची रक्कम दोन आठवड्यांच्या आत सशस्त्र सेना लढाईतील मृतांच्या कुटुंबीयांसाठीच्या कल्याण निधीमध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT