Cockroache found In cold coffee Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : संतापजनक! कोल्ड कॉफीमध्ये झुरळ आढळलं, मालाडच्या मॉलमधील धक्कादायक घटना

Cockroache found In cold coffee at Inorbit Mall : मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी आईस्क्रिममध्ये मानवी बोट सापडलं होतं. त्यानंतर आता कॉफीमध्ये झुरळ आढळल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

संजय गडदे, साम टीव्ही मुंबई

मुंबईमध्ये कोल्ड कॉफीमध्ये झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मालाड पश्चिमेकडील इनॉर्बिट मॉलमधील ही घटना असल्याचं सांगितलं जातंय. यापूर्वी समोश्यामध्ये झुरळ, पाल तर आईस्क्रिममध्ये देखील मानवी बोट सापडल्याच्या घटना मुंबईत घडल्या होत्या. त्यानंतर आता कॉफीमध्ये देखील झुरळ आढळल्याची घटना समोर आलीय, त्यामुळे मुंबईकर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

कोल्ड कॉफीमध्ये झुरळ आढळलं

मालाडमधील आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळल्याची घटना ताजी असतानाच आता कोल्ड कॉफीमध्ये झुरळ आढळल्याची तक्रार करण्यात आलीय. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवणाऱ्या प्रतीक रावत ( वय 25) याने ऑर्डर केलेल्या कोल्ड कॉफीमध्ये झुरळाचे (Mumbai News) अवशेष आढळून आले होते. त्यामुळे या तरूणाने तक्रार केलीय. याप्रकरणी मालाड पोलिसांनी हॉटेल मॅनेजर, वेटर आणि अन्य संबंधितांवर कलम १२५,२७४,२७५ आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला (Malad West) आहे.

कशी घटना घडली?

याबाबत सविस्तर वृत्त असं की, तक्रारदार रावत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रावत मित्रासह मालाड पश्चिमच्या इन्फिनिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या लाउंजमध्ये गेले (cockroache found In cold coffee) होते. तेथे त्यांनी दोन कोल्ड कॉफी ऑर्डर केल्या होत्या. वेटरनं कॉफी आणल्यानंतर पहिल्या सिपमध्ये त्यांना कॉफी कडवट लागली. त्यामुळे त्यांनी वेटरला बोलावून त्यामध्ये स्वीट टाकण्यास सांगितलं.

मालाड पोलिसात तक्रार

त्यानंतर वेटर दोघांचेही ग्लास घेऊन बार काउंटरवर गेला. वेटरने कॉफीतस्वीट टाकून परत त्यांना कॉफी आणून दिली. प्रतीक ती कोल्ड कॉफी काचेच्या ग्लासमधून स्ट्रॉ ने पीत होता. तेव्हा ग्लासमध्ये थोडी कॉफी (Inorbit Mall Malad West) शिल्लक राहिल्यावर त्यात काहीतरी असल्याचं जाणवलं. त्यामुळे त्यांनी बारकाईने पाहणी केली असता त्यात झुरळ दिसलं. याचा फोटो काढून त्यांनी या प्रकरणी मालाड पोलिसात तक्रार दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aloo Paratha: दररोज आलू पराठा खाल्ल्यास काय होईल?

PM Modi : नेहरूंनी 'वंदे मातरम्'लाच विरोध केला, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आक्रमक भाषण, इंदिरा गांधींवर साधला निशाणा

Maharashtra Live News Update: विधानभवनावर आज चार मोर्चे धडकणार , यशवंत स्टेडियमपासून सर्व मोर्चे निघणार

Gautam Gambhir: कोचला टार्गेट करू नका, त्याची नोकरीही...! गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले रवी शास्त्री

RBI Rule: तुमचं झिरो बॅलन्स अकाउंट आहे? RBI ने घेतला महत्त्वाचा निर्णय; हे ४ नियम लवकरच बदलणार

SCROLL FOR NEXT