CNG-PNG Price Saam Tv
मुंबई/पुणे

CNG -PNG Price: सीएनजी-पीएनजीच्या दरात होणार वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; जाणून घ्या नवे दर

CNG -PNG Price Will Be Increase: आज रात्रीपासून सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर लागू होणार आहेत. सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ होणार आहे.

Priya More

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईकरांना महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये उद्यापासून म्हणजेच ९ जुलैपासून वाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. आज रात्रीपासून सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर लागू होणार आहेत. सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ होणार आहे.

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून आज रात्रीपासून नवे दर लागू होणार आहे. सीएनजीच्या दरामध्ये दीड रुपयांनी वाढ होणार असून मुंबईकरांना आता एक किलो सीएनजीसाठी ७५ रुपये मोजावे लागणार आहे. तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ होणार असून पीएनजीचा दर ४७ रुपयांवरून ४८ रुपये इतका होणार आहे.

सीएनजी गॅसच्या दरामध्ये वाढ होणार असल्यामुळे आता मुंबईतील वाहन धारकांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यांना सीएनजीच्या खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास देखील महाग होण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील बऱ्याच रिक्षा, टॅक्सी या सीएनजीवर चालतात.

तर, मुंबईत अनेक जण अन्न शिजवण्यासाठी पीएनजीचा वापर करतात. आता पीएनजीमध्ये देखील वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. म्हणजेच त्यांचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे. एलपीजीच्या तुलनेमध्ये पीएनजी हे अधिक स्वस्त असते. त्यामुळे याचा जास्त वापर केला जातो. त्याचसोबत पीएनजी सुरक्षित आणि पर्यायवरणाला अनुकूल असल्याचे सांगितले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Shinde : भाजपला धक्का! सचिन शिंदे मशाल हाती घेणार | Marathi News

Maharashtra Exit Poll: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना पुन्हा धक्का, चंद्रकांत पाटील संभाव्य आमदार? VIDEO

Ind vs Aus: ऑस्ट्रेलियासमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली; अवघ्या १५० रन्समध्ये खुर्दा

Maharashtra Exit Poll : निलंगा विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

Saam Exit Poll: डोबिंवली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून रवींद्र चव्हाण मारणार बाजी? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT