Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : संतापजनक! नकार दिल्याने मुलीला पळवून नेत केला अत्याचार; कुटुंबियांना दिली जीवे मारण्याची धमकी

कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

सुरज सावंत

Mumbai Crime : मुंबईमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबईच्या ना.म.जोशी मार्ग परिसरात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती अत्याचार करण्यात आला आहे. तसेच तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. (Latest Mumbai Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, ना.म जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पश्चिम रेल्वे रुळालगत असलेल्या निर्जनस्थळी मुलीवर आरोपीने अत्याचार केला. पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. आरोपीच्या मित्राने बुधवारी पीडित मुलगी घरी असताना आरोपीने बोलाल्याचा निरोप दिला होता.

मात्र पीडित मुलगी येत नसल्याने आरोपी आणि त्याच्या मित्राने मुलीला जबरदस्ती रेल्वे रुळालगत असलेल्या निर्जनस्थळी नेत अत्याचार केले. या वेळी मुलीने आरडा ओरडा करून विरोध केला असता आरोपी नराधमांनी तिला बेदम मारहाण केली. तसेच कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली.

ऐवढ्यावरच न थांबता आरोपीने घडलेल्या प्रकाराची माहिती कुणाला सांगितल्यास बदनामी केली जाईल अशी धमकी दिली. घडलेल्या प्रकाराची माहिती मुलीने घरातल्यांना दिल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात कलम 376(ड), 506, 34 भादवि 4,8,17 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान मुंबई रेल्वे सेंट्रल पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hirvi Mirchi Loncha: हिरव्या मिरचीचा झणझणीत लोणचा अवघ्या १० मिनिटांत बनवा, ही आहे सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: बिहारमधील विजयानंतर नाशिकमध्ये भाजपचा जल्लोष

बिहार चुनाव तो झाकी है, BMC बाकी है ! बिहारमध्ये NDA ला यश, महाराष्ट्रात जल्लोष, पेढे वाटले, ढोल वाजले

Bihar Election: लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची अलीनगरमधून दमदार आघाडी|VIDEO

Pune Accident : आईच्या मैत्रिणीसोबत देवदर्शनाला गेली, वाटेतच काळाने घातला घाला; पुण्यातील अपघातात ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT